कोणाच्या रक्तात दरोडे आहेत, हे योग्य वेळी सांगेन : राहुल कुल

माझे आजोबा बाबूराव कुल हे दौंड पंचायत समितीचे पहिले सभापती होते. वडील सुभाष कुल हे आमदार होते. रमेश थोरात यांनी त्यांचे पुर्वज काय करत होते, हे एकदा जाहीर करावे.
MLA Rahul Kul's reply to former MLA Ramesh Thorat's allegation
MLA Rahul Kul's reply to former MLA Ramesh Thorat's allegation

केडगाव (जि. पुणे) : ‘दौंड तालुक्यात दरोडे घालायचे काम कुणी केले, हे जुन्या पिढीला माहित आहे. नवीन पिढीला हा इतिहास सांगायला लावू नका. या इतिहासावर विश्वास बसणार नाही इतके ते कटू सत्य आहे. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेले बरे. परंतू योग्य वेळ आल्यानंतर कोणाच्या रक्तात चोऱ्यामाऱ्या व दरोडे आहेत, हे मी तालुक्याला दाखवून देईन,’ अशा शब्दांत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांच्या आरोपाला उत्तर दिले. (MLA Rahul Kul's reply to former MLA Ramesh Thorat's allegation)

आमदार राहुल कुल हे चोऱ्या, दरोडे घालूनही साजूक असल्यासारखे वागत आहे, अशी टीका रमेश थोरात यांनी कुल यांच्यावर केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार कुल बोलत होते.
 
हेही वाचा : चोऱ्यामाऱ्या, दरोडे घालूनही आमदार राहुल कुल साजूक असल्यासारखे वागतात 

कुल म्हणाले, माझे आजोबा बाबूराव कुल हे दौंड पंचायत समितीचे पहिले सभापती होते. वडील सुभाष कुल हे आमदार होते. रमेश थोरात यांनी त्यांचे पुर्वज काय करत होते, हे एकदा जाहीर करावे. माझ्या पुर्वजांच्या सामाजिक योगदानाचे व त्यांच्या पुर्वजांच्या कारनामांचे थोरात यांना विस्मरण झालेले दिसते; परंतू हे वयोमानानुसार होत राहते. त्यांना आठवत नसेल तर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारावे. त्यांना त्यांचा इतिहास आठवत असता तर ते असे बोलले नसते. चोऱ्यामाऱ्या करणे हे कुणाच्या रक्तात आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. दरोडे घालण्याची परंपरा कोणाची आहे, हे आठवण्यासाठी थोरात यांनी मागे वळून पाहण्याची गरज आहे.

रमेश थोरात यांनी साखर आयुक्तांकडे चौकशीची मागणी करताना ते कारखान्याचे संचालक झाले, तेव्हापासून चौकशीची मागणी करावी. म्हणजे सत्य बाहेर येईल. ते कारखान्याचे उपाध्यक्ष असताना त्यांनाही सह्यांचे अधिकार होते. त्यांनी काय काय कारनामे केले, हे संपूर्ण दौंड तालुक्याला माहित आहे. ते कारखान्यात सर्वेसर्वा असताना त्यांनी विनातारण विनाकारण ५५ कोटी रूपयांचे कर्ज घेतले. अशा अनेक कर्जांचा बोजा कारखान्यावर आहे. काय चौकश्या लावयाच्या आहेत, त्या त्यांनी लावून घ्याव्यात. फक्त त्यांच्या कार्यकालापासून चौकशी झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे, असेही राहुल कुल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com