काँग्रेस येथे माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतेय : गृहमंत्री बरळले

काँग्रेसने गृहमंत्री यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
Criticism to Home Minister for making jokes on rape incident
Criticism to Home Minister for making jokes on rape incident

बंगळूर : म्हैसूरच्या चामुंडेश्वरी टेकडीच्या पायथ्याजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने म्हैसूरलाच नाही, तर संपूर्ण कर्नाटकला धक्का बसला. परंतु कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हे या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता विनोद करू लागले आहेत. गृहमंत्री ज्ञानेंद्र यांच्या वक्तव्यांमुळे आणि अशा गंभीर घटनेबद्दल विनोद केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Criticism to Home Minister for making jokes on rape incident)

काँग्रेसने बलात्काराच्या घटनेचे राजकारण केल्याचा आरोप करत मंत्री बंगळूरमध्ये गुरूवारी (ता. २६) म्हणाले, ‘तेथे (म्हैसूर) बलात्कार झाला आहे, पण काँग्रेस इथे गृहमंत्र्यांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे.’ जेव्हा त्यांना त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचा अर्थ हा विनोद आहे आणि कोणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नाही.

आदल्या दिवशी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी पीडितेच्या कथित गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देण्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला होता. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, ‘ते (पीडित) संध्याकाळी ७-३० वाजता एका निर्जन ठिकाणी गेले. त्यांनी त्यावेळी तिथे जायला नको होते. पण, आम्ही कोणालाही कुठेही जाण्यापासून रोखू शकत नाही.’ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न घेता जबाबदार मंत्र्यांना विनोद सूचत असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
 
हेही वाचा : चोऱ्यामाऱ्या, दरोडे घालूनही आमदार राहुल कुल साजूक असल्यासारखे वागतात 

काँग्रेसने गृहमंत्री ज्ञानेंद्र यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, ‘गृहमंत्र्यांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसजनांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत.’

म्हैसूरच्या चामुंडेश्वरी टेकडीच्या पायथ्याजवळ २४ ऑगस्टच्या रात्री  सहा जणांनी विद्यार्थिनीवर सामूहीक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तिच्या सोबत असलेल्या तिच्या मित्रालाही दगडाने ठेचण्यात आले. गटात चार किंवा पाच आरोपींचा समावेश होता. कथित घटना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हेलिपॅडजवळील जंगल क्षेत्रात अलनहळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित युवती आणि तिच्या मित्रावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही आता धोक्याच्या बाहेर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com