आढळराव, आता तुम्हाला माफी नाही ; मोहितेंनी फटकारले

मोहिते पाटलांनी आढळराव पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.
04dilip_20mohite_adhalrao.jpg
04dilip_20mohite_adhalrao.jpg

राजगुरूनगर (जि. पुणे) :  खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे मावळते सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील बहुचर्चित अविश्वास ठरावानंतर काल ही सभापतीपदाची निवडणूक पार पडली. चौदा सदस्यांच्या सभागृहात केवळ चार सदस्य असतानाही अखेर राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. 

आमदार दिलीप मोहिते यांची ही किमया असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या निवडीनंतर मोहिते पाटलांनी Dilip Mohite शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील Adhalrao Patil यांच्यावर तोफ डागली आहे. 

''तुम्ही वयाने, मनाने मोठे होता..पण तुम्ही चुकीच्या गोष्टींची साथ देऊन टिकाटिपणी केली. चुकीचं काम करणा-या व्यक्तीची पाठराखण करतात. आढळराव पाटील तुम्हाला आता माफी नाही,'' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आढळरावांवर टीका केली आहे. सभापती निवड झाल्यानंतर मोहिते पाटील बोलत होते.

मोहिते पाटील म्हणाले, ''खेड पंचायत समिती सभापती पदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस असा संघर्ष मागील तीन महिन्यापासून सुरु आहे.  या वादाला खतपाणी घालण्याचे काम आढळराव पाटील यांनी केलं आहे. विनयभंग, बलात्कार, हाणामारी करणा-या भगवान पोखरकरांसारख्यांच्या पाऊलावर पाऊल टाकुन तुम्ही साथ देणार असाल तर अशा तुमच्या राजकारणाला लखलाभ''

गेली तीन महिने सुरु असलेल्या अनेक राजकीय आणि न्यायालयीन घडामोडीनंतर काल ही निवडणूक पार पडली. पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रवादीचे ४ सदस्य, शिवसेनेचे ५ बंडखोर आणि भाजपचे १ सदस्य यांनी बरोबरच प्रवेश केला. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्तात भगवान पोखरकर आले होते. त्यानंतर शिवसेनेच्या ज्योती अरगडे, मच्छिंद्र गावडे आणि कॉंग्रेसचे अमोल पवार उपस्थित झाले. सभापतिपदी चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यावर राष्ट्रवादीच्या मंदा शिंदे, नंदा सुकाळे, वैशाली गव्हाणे, भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर आणि शिवसेनेचे बंडखोर अंकुश राक्षे, अमर कांबळे, सुभद्रा शिंदे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर यांनी त्यांचा सत्कार केला. 

शिवसेनेच्या सदस्यांना, पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप पक्षाने बजावला होता. त्यामुळे बंडखोर सदस्यांना चिंता होती. मात्र जातपडताळणीच्या तांत्रिक मुद्द्यावर पोखरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांच्यासमोरील पक्षादेश धुडकावण्याचे धर्मसंकट टळले. मात्र, शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अर्जाचा अद्याप निकाल लागलेला नाही. 

१८ ऑगस्ट रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान झाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या पाच बंडखोर सदस्यांनी पक्षादेश धुडकावून ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तोही विषय या अर्जाच्या सुनावणीत समाविष्ट होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. १८ ऑगस्ट रोजी झालेली अविश्वास ठरावाची प्रक्रियाही तांत्रिकदृष्ट्या योग्य झालेली नाही, अशी भूमिका घेऊन पंचायत समिती सदस्य अमोल पवार, ज्योती अरगडे आणि भगवान पोखरकर यांनी पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. याचिकेवर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com