महाविकास आघाडीचे दिशाहीन सरकार उलथून टाकू : बावनकुळे

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. गरीब, पुरग्रस्त व दुष्काळ ग्रस्तांसाठी या सरकारने मदत केली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम मुंबई पुरते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम बारामती पुरते मर्यादित असून,मंत्री आपल्या विभागाचे पालकमंत्री झाले आहेत.
महाविकास आघाडीचे दिशाहीन सरकार उलथून टाकू : बावनकुळे
pune.jpg

नारायणगाव : अनाचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी असलेल्या महाविकास आघाडीने राज्याचे वाटोळे केले आहे. जनतेचा अपमान करून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी सरकार तयार केले. दिशाहीन असलेली महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करून पुढील काळात हे सरकार उलथून टाकू. राज्यात क्रांती घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर कार्यकर्त्यांनी सज्ज रहा, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Let's overthrow the directionless government of Mahavikas Aghadi: Bavankule)

नारायणगाव येथील भारतीय जनता युवा मोर्चा जुन्नर तालुका जनसंपर्क कार्यालय व युवा वॉरियर योजनेचे उदघाटन माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांचे हस्ते झाले. या वेळी काही तरुणांनी भाजपा युवा मोर्चात प्रवेश केला.

या वेळी  माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. कार्यक्रमास युवा वॉरियर महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक अनुप मोरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सुशील मेंगडे, किरण दगडे पाटील, भगवान घोलप, युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष तांबे,  संदीप फाकटकर, अमोल कोल्हाळ आदी उपस्थित होते.

माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. गरीब, पुरग्रस्त व दुष्काळ ग्रस्तांसाठी या सरकारने मदत केली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम मुंबई पुरते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम बारामती पुरते मर्यादित असून, मंत्री आपल्या विभागाचे पालकमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचे रक्षण केले असून, राज्यातील पूरग्रस्तांसाठी सातशे कोटी रुपये मंजूर केले. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच मदत केली नाही.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे जाहीर केले. मात्र सरकार स्थापन करण्याची वेळ येताच बेईमानी केली. पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा बदला घ्यायचा आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात युवा वॉरियरच्या माध्यमातून २५ लाख युवकांचे टार्गेट ठेवले आहे. या युवकांच्या माध्यमातून संघटना मजबूत करून संघर्ष करण्याची ताकद निर्माण करायची आहे.हेच युवक पुढील निवडणुकीत राज्यात क्रांती घडवतील असा विश्वास या वेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव यांनी केले.

पंकजा मुंडे भाजप सोडू शकत नाही

ऊर्जा मंत्री  बावनकुळे म्हणाले, की पंकजाताई शिवसेनेत जाणार, या बातम्या कपोलकल्पित आहेत. त्या भाजपच्या सचिव असून, वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या रक्त रक्तात भाजप आहे. भाजप सोडण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही येणार नाही.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in