बदल न दिसल्यास दर महिन्याला मला वेल्ह्यात यावे लागेल : सुळेंकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

संघटनेतील संवेदनशीलपणा कमी झालाय का?
If I don't see any change, I have to come to Velha every month : Supriya Sule
If I don't see any change, I have to come to Velha every month : Supriya Sule

वेल्हे (जि. पुणे) : ‘ताई, आम्हाला गेल्या दीड वर्षापासून रेशनिंग मिळत नाही. ताई, घरकुलांचे बील काढण्यासाठी ग्रामसेवक पैसे मागतात. ताई, आमच्या येथे लाईटची समस्या अशा एक ना अनेक वैयक्तीक अडचणींच्या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या तीन महिन्यांत यामध्ये काही बदल न दिसल्यास दर महिन्याला नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मला वेल्ह्यात यावे लागेल, असे म्हणत पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. (If I don't see any change, I have to come to Velha every month : Supriya Sule)

वेल्हे तालुका आढावा बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे नागरिकांनी समस्यांचा अक्षरक्षः पाढा वाचला. या आढावा बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती मतदारसंघाचे महावितरणचे समन्वयक प्रवीण शिंदे, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, जिल्हा सरचिटणीस आनंद देशमाने, माजी सभापती निर्मला जागडे, तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, प्रमोद लोहकरे, हनुमंत कार्ले, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत सर्वाधिक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आल्या आहेत. चेलाडी-वेल्हे रस्त्याच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी गटारे काढणे, साईडपट्ट्या काढल्या गेल्या नाहीत. तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.. केळद खिंडमध्ये पडलेले खड्डे गेल्या तीन वर्षांपासून बुजविले गेले नाहीत, अशी तक्रार केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. 

सोंडे ते चिरमोडी रस्त्याची देखील दुरवस्था झाली असल्याची तक्रार सरपंच अशोक सरपाले यांनी केली. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय संकपाळ यांना उत्तरे देता आली नाहीत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावून विचारणा केली जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

तालुक्यात रेशनिंगचे अन्नधान्य सामान्य लाभार्थ्यास मिळत नसल्याची तक्रार राघू भुरुक यांनी केली. महावितरणचे सडलेले खांब बदलणे, गावांमध्ये रोहित्र बसविणे आदी तक्रारींबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांना आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी कार्यालयात बसून येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत. स्टेजवर गर्दी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी नागरीकांची कामे करावीत. वेल्हे तालुका संघटनेतील संवेदनशीलपणा कमी झालाय का?, असा प्रश्न विचारत तीन महिन्यांत येथील नागरिकांच्या समस्या सुटल्या नाही, तर मला दर महिन्यास वेल्ह्यात यावे लागेल, असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी बोलताना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com