या कारणामुळे ती चार पोलीस ठाणी पिंपरीला जोडण्याचा विचार; कृष्णप्रकाश - Proposal to connect rural Pune police station Pimpri Commissioner office in | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

या कारणामुळे ती चार पोलीस ठाणी पिंपरीला जोडण्याचा विचार; कृष्णप्रकाश

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पुणे ग्रामीणमधील चार पोलिस स्टेशन तथा ठाण्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : पावणेतीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्तालयात पुणे ग्रामीणमधील चार पोलिस स्टेशन तथा ठाण्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या ठाण्यांच्या हद्दीतील गावांनी त्याला मंजूरी दिल्यानंतरच ही ठाणी आयुक्तालयात येणार आहेत. तसे झाले, तर सध्या तळेगावपर्यंत असलेली आयुक्तालयाची हद्द लोणावळ्यापर्यंत वाढणार आहे. ( Proposal to connect rural Pune police station Pimpri Commissioner office in) 

पुणे शहर पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीणचे विभाजन करून १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी पोलिस आयुक्तालयाची निर्मिती झाली. सध्या तेथे १५ पोलिस ठाणी आहेत. त्यात पुणे ग्रामीणमधील मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलिस ठाणी समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी पोलिस महासंचालकांना दिला होता. त्यावर पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांचा अभिप्राय महासंचालकांनी मागवला आहे.  

हे ही वाचा : पुण्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार तासशेवर

या चारही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावांना हा विषय कळवून त्यावर त्यांना आयुक्तालयात जायचे आहे का ग्रामीणमध्येच राहायचे आहे, यावर ग्रामसभा घेऊन ठराव करण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामसभांचा हा निर्णय या अभिप्रायात असणार आहे.

दरम्यान, पोलिस कारवाईत सूसूत्रता येऊन ती जलदरितीने व्हावी, या उद्देशातून हा प्रस्ताव दिल्याचे कृष्णप्रकाश यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी व शहरी तोंडावळा असलेल्या पुणे ग्रामीणमधील या चार पोलिस ठाण्यांच्य हद्दीतील गुन्हेगारीत बरेचसे साम्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्तालयात गु्न्हे करून गुन्हेगार हे या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आश्रयाला जात असल्याने त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई यामुळे करता येणार आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : कोरोना लशीमुळे देशात आतापर्यंत एकाचा मृत्यू; केंद्र सरकारची कबुली

पुणे ग्रामीणमधील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व देहूरोड ही पाच मोठी व महत्वाची पोलिस ठाणी अगोदरच पिंपरी आयुक्तालयात आलेली आहे. त्यानंतर आता तशीच ही आणखी चार पोलिस ठाणी आयुक्तालयात घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे पुणे ग्रामीणचे वलय काहीसे कमी होईल, अशी चर्चा आताच सुरु झाली आहे. मात्र, ही ठाणी आयुक्तालयात गेल्यानंतरही पुणे ग्रामीणचे कार्यक्षेत्र हे पिंपरी आयुक्तालयापेक्षा मोठेच तसेच तेथील पोलिस ठाण्यांची संख्याही जास्तच राहणार आहे. 
Edited By - Amol Jaybhaye  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख