आरोग्य तपासणीत राज्यमंत्री आढळले फिट! - Health check up found Dattatreya bharane fit | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्य तपासणीत राज्यमंत्री आढळले फिट!

विनायक चांदगुडे
शनिवार, 15 मे 2021

राज्यमंत्री भरणे यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला तत्काळ होकार दिला.

शेटफळगढे  (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे कोविड विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचे उद॒घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya bharane) यांची आरोग्य तपासणी (Health check up) करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत भरणे हे तंदुरुस्त (फिट) असल्याचे आढळून आले. (Health check up found Dattatreya bharane fit)

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे ग्रामपंचायत व आपत्ती ग्राम व्यवस्थापन समितीच्या वतीने यशोदीप विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड विलगीकरण कक्षाचे उद्‌घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते आज (ता. १५ मे) करण्यात आले. 

हेही वाचा : धोका कोरोनाच्या भारतीय प्रकाराचा...आता लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी

या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी भरणे यांना आपण तालुक्‍यातील जनतेची काळजी घेता. आपणही राज्याच्या दौऱ्यावर असता, त्यामुळे आपल्याही शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी सर्वात आधी तपासून पाहू, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. त्यावर राज्यमंत्री भरणे यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला तत्काळ होकार दिला.

त्यानंतर लगेचच समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी, आरोग्य सेविका धनाबाई भिटे यांनी दत्तात्रेय भरणे यांची तपासणी केली असता ऑक्सिजन पातळी 98 आणि शरीराचे तापमान 34.7 अंश सेल्सिअस असल्याचे आढळून आले. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत भरणे हे तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून समाधान व्यक्त केले. त्यानंतर भरणे यांनी तेथे उपस्थित असलेल्या पाच ग्रामस्थांच्या शरीराच्या तापमानाची स्वतः तपासणी केली.

या वेळी उपस्थित ग्रामस्थांना ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने भरणे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच, गावात विलगीकरण कक्ष सुरू केल्याबद्दल ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य प्रतापराव पाटील, भिगवणचे पोलिस उपनिरीक्षक जीवन माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, यांच्यासह गावचे पोलिस पाटील तुषार झेंडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लालासाहेब साळुंके, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार, रामदास चव्हाण, स्नेहदीप नांदगुडे, ग्रामसेविका मनीषा क्षीरसागर यांच्यासह सुनील खंडाळे, संदीप चांदगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख