धोका कोरोनाच्या भारतीय प्रकाराचा...आता लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, ब्रिटनने लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
UK reduces gap between two doses of covid vaccine
UK reduces gap between two doses of covid vaccine

नवी दिल्ली :  भारतात आढळणाऱ्या कोरोना (Covid19) विषाणूच्या प्रकारांवर लशीच्या (Covid Vaccine) परिणारकारकेतबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शंका व्यक्त केली आहे. तसेच, हा कोरोना विषाणूचा प्रकार अधिक संसर्ग पसरवणारा आणि जीवघेणा असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. यामुळे ब्रिटनने UK) कोरोना लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

भारतात आढळणारा कोरोना विषाणूचा प्रकार बी.1.617 हा पहिल्यांदा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडला. आता जगभरातील 44 देशांमध्ये सापडला आहे. हा विषाणू अतिशय वेगाने संसर्ग पसरवणारा आहे. भारतातील सुमारे 0.1 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोस सिक्वेन्स तपासणी करण्यात आली आहे. 

ब्रिटनमध्येही भारतात आढळणारा विषाणूचा प्रकार वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभूमीर बोलताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले की, कोरोना लशीचा दुसरा डोस हा 50 वर्षांवरील व्यक्ती आणि इतर आजार असलेल्यांसाठी नियोदित वेळेआधी देण्यात येईल. कारण भारतात आढळणाऱ्या विषाणूचा प्रकार वेगाने पसरवत आहे. आधी दोन डोसमधील अंतर 12 आठवडे होते, आता ते 8 आठवड्यांवर आणले आहे. 

भारतात आढळलेल्या विषाणूचा प्रकार अधिक संसर्ग पसरवणारा असल्याने आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. लॉकडाउ 21 जूनला शिथिल होत आहे. संसर्ग वाढल्यास लॉकडाउनच्या नियोजित वेळापत्रकावर परिणाम होऊ शकते, असे जॉन्सन यांनी स्पष्ट केले. म्हणजेच संसर्ग अधिक वाढल्यास लॉकडाउन शिथिल करण्याची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सापडणारा बी.1.17 आणि भारतात सापडणारा बी.1.617 मागील काही आठवड्यांपासून काही कमी होऊ लागले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे आणखी धोकादायक म्युटेशन्स तयार झाले असून, ते बी.1.617.1 आणि बी.1.617.2 आहेत. बी.1.617 पासून तयार झालेले नवीन प्रकार अधिक संसर्ग पसरवणारे आहे. 

बी.1.617 या प्रकारावर लस आणि औषधांचा प्रभाव तसेच, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका या गोष्टींबाबत अनिश्चितता आहे. यावर प्राथमिक अभ्यास झाला असला तरी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. फायजर आणि मॉडर्ना यांच्या लशीची प्रभावही या प्रकारावर मर्यादित स्वरुपातच दिसून आला आहे, असे डब्लूएचओने म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com