राज्यपालांनी सायकलपटू महिलेच्या तोंडावरचा मास्क स्वत:च्या हाताने काढला

या रॅलीतील एका सायकल पटूचा मास्क स्वत:च्या हाताने काढतानाचा राज्यपालांचा एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
bhagatsingh koshyari.jpg
bhagatsingh koshyari.jpg

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या वाढदिवसानिमित्त  आज (ता. १७) कोथरूडमध्ये (Kothrud)  'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ही रॅली काढण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पण  या रॅलीतील एका सायकल पटूचा मास्क स्वत:च्या हाताने काढतानाचा  राज्यपालांचा एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. रॅलीत सहभागी झालेल्या निरुपमा भावे (Niruama Bhave)  यांचा  राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढताना, राज्यपालांनी चक्क भावे यांचा मास्क स्वतःच्या हाताने काढला. यामुळे राज्यपालांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, अशी एकच चर्चा सुरु झाली. 

दरम्यान, कोरोना काळात (Covid19  मास्क लावणे, हात लावणे, आणि सामाजिक अंतर पाळणे,  या त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र निर्बंधांमध्य़े शिथिलता देताच या सर्व नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. अशातच  राज्यपालांनी एखाद्या सायकल स्वाराचा मास्क स्वतःच्या हाताने काढणे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com