'नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही नाही' : संजय राऊत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही दिसत नाही. मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत.
narendra modi sanjay raut.jpg
narendra modi sanjay raut.jpg

मुंबई : '' पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही दिसत नाही.  मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत.  म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, मी देखील त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो,'' असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. आज ते ७१ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यावेळी संजय राऊत यांनीदेखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

''नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते असून ते अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत.  आम्ही त्यांच्या संघर्षाचा काळ पाहिला आहे.  मोदी सरकारच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले. भाजपाने नेहमीच आघाड्या बनवून सत्ता मिळवली, पण मोदींच्या काळात एक हाती सत्ता स्थापन केली. ही त्यांच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हव.'' 

तसेच त्यांनी अभिनेता सोनू सुदवर झालेल्या कारवाईबद्दलही आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ''सोनू सूद विषयी पक्षाची भूमिका असण्याचे कारण नाही, मात्र गेल्या वेळी याच सोनू सुदने अनेक प्रवासी मजुरांसाठी गाड्या, विमान बुक केली होती, त्यावेळी भाजपने आम्हाला सांगितलेलं, की एकटा माणूस काय करू शकतो, मात्र सरकार म्हणून आम्ही काही करत नाही, मात्र काल मला समजलं, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक धोरणाविषयीचे काम सोनूने घेतल्यावर या सरकारचा सोनू सूद दुश्मन झाला, ज्याने कर चुकला आहे त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र त्यामागे ही पार्श्वभूमी असल्याचे मला आता लक्षात आले.''

''आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यानंतर ते कोणता केक कापतात हे बघावे लागेल, मात्र मला खात्री आहे की या देशातील जनतेच्या महागाई विषयीच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील.  त्यामुळे संध्याकाळपर्यंत मोदीजी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणारा केक कापतात का,आमचे लक्ष असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

तसेच, चंद्रकांत दादा हे राजकीय विरोधक असले तरी ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत. आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत.  काल ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो, पण मी त्यांना निरोप पाठवला आहे की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावं लागेल, असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. उद्धवजींच्या नेतृत्वात  आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवु, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माझ्या असे कानावर आले आहे की नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा केली आहे. म्हणून कदाचित ते म्हणाले असतील.  जर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा,''असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले  आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com