सभापतीच्या हल्ल्यानंतर राजगुरुनगरमध्ये दंगलविरोधी पथकाचा बंदोबस्त

हा सर्व हल्ल्याचा थरार रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
District Police Anti-Riot Squad deployed in front of Khed Panchayat Samiti
District Police Anti-Riot Squad deployed in front of Khed Panchayat Samiti

राजगुरुनगर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला आहे. त्यानंतर सभापती पोखरकर विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य यांच्यात एका खासगी रिसॉर्ट तुंबळ हाणामारी झाली. त्या घटनेनंतर आज (ता. २८ मे) सकाळपासूनच खेड पंचायत समितीसमोर पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या दंगलविरोधी पथकाच्या 12 जणांच्या तुकडीचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (District Police Anti-Riot Squad deployed in front of Khed Panchayat Samiti)

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या 11 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यावर 31 तारखेला प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासमोर मतदान होणार आहे. याआधीच पुण्यातील डोणजे येथील एका खाजगी रिसॉर्टवर सहलीला गेलेल्या सदस्यांवर विद्यमान सभापती भगवान पोखरकर व एक सदस्य सहकारी यांनी जिवघेणा हल्ला केला. हा सर्व हल्ल्याचा थरार रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, त्यानुसार हवेली पोलिस ठाण्यात प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरुन विद्यमान सभापती भगवान पोखरकर, केशव अरगडे, जालिंदर पोखरकर, यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड तालुक्यात कोरोना महामारीचे भीषण संकट असताना कोरोना काळातील मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या खेड पंचायत समितीमध्ये राजकिय नाट्य सुरु झाले आहे, त्यामुळे तालुक्यात या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच खेड पंचायत समितीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या दंगल विरोधी पथकाचा बंदोबस्त सकाळपासूनच लागला आहे. 

खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन सुरु झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील वादाने आता तोंड बाहेर काढले आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हेच गोळीबारचे प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्यांच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे.   

नेमकं काय घडलं

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. त्यामुळे समितीच्या सदस्य सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर सदस्य सहलीसाठी निघून गेले, त्याची माहिती सभापती पोखरकर यांना मिळताच त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

पुण्यातील डोणजे परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ल्या केला आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीवरून हा वाद सुरु होऊन शिवसेनेतील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com