`माजी खासदार आढळरावच गोळीबार प्रकरणाचे सूत्रधार; त्यांच्यावरही खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा`

या वादाचे पडसाद महाविकास आघाडी सरकारमध्ये उमटण्याची चिन्हे
dilip mohite-adhalrao
dilip mohite-adhalrao

राजगुरुनगर :  खेड तालुका पंचायत समिती सभापती अविश्वास ठरावाच्या राजकीय नाट्याला हिंसक वळण लागल्यानंतर, आता हा वाद शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पर्यंत जाऊन पेटला आहे. (No confidence motion agaisnt Bhagwan Pokharkar) पंचायत समिती सदस्यांना सभापती भगवान पोखरकर यांनी केलेल्या मारहाणी व राड्यामागचे सूत्रधार माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केली आहे. (MLA Dilip Mohite Demands FIR against Ex MP Shivajirao Adhalrao Patil for firing incident)

सभापती भगवान पोखरकर हे गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. महाविकास आघाडी असताना शिवसेनेला एवढा कसला उन्माद आला आहे, असा सवालही मोहिते-पाटील यांनी केला आहे.  दरम्यान मी आता मुख्यमंत्र्यांकडे चाललो असून याप्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना तपशीलवार माहिती देणार आहे, असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. 

खेडमधील सभापतीवर अविश्वास ठरावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना याबाबत काही कल्पना नाही, मात्र माझ्या पंचायत समिती सदस्यांचे संरक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे. तेवढीच मी पार पाडत असताना, पोखरकर यांनी राडा, मारहाण आणि गोळीबार केला आहे, असे मोहिते म्हणाले. जर सहकारी पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांवर शिवसेनेचा सभापती गोळीबार करणार असेल, तर असली कसली आघाडी,असा सवाल मोहिते यांनी केला. 

 शिवसेनेचा सभापती गोळीबार करतो, हे अती झाले. तो मुळातच गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी विनयभंगाचा, घर पाडल्याचा आणि अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचा गुन्हा दाखल आहे, असा आरोप मोहिते-पाटील यांनी केला.   मूळच्या शिवसैनिकांशी आपला संघर्ष नाही,  ते माझ्याबरोबर आहेत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेल्यांना जास्त माज आला आहे, असे मोहिते म्हणाले. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर सभापती झालेल्या पोखरकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे पाठबळ चालत होते. आणि आता राजीनामा द्यायच्या वेळी नेत्यांना विचारून सांगतो, असे म्हणायला लागले. त्यामुळे ठराव दाखल झाला, पण हा शिवसेनेतील अंतर्गत सत्तासंघर्ष आहे. त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसून, हे त्यांच्यात्यांच्यातील वाद आहेत. मी फक्त आमच्या पंचायत समिती सदस्यांच्या रक्षण करण्याचं कर्तव्य करत होतो. तसेच ठराव दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी होते असा दावाही आमदार मोहिते-पाटील यांनी केला. 

या प्रकरणाचे सूत्रधार आढळराव पाटील जाणीपूर्वक माझ्या खेड तालुक्यात चिथावणी देतात. शिवसेनेत त्यांचे कोणी ऐकत नाही आणि माझ्या नावाने खडे  फोडतात. म्हणून पोलिसांना माझी विनंती आहे की या मागचा खरे सूत्रधार असलेले आढळराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आतासुद्धा ज्याच्यावर खून करण्याचा प्रयत्न आणि विनयभंग असे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा सभापतीला घेऊन ते मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे निघाले आहेत, अशी माझी माहिती आहे,  असे मोहिते म्हणाले. याच आढळरावांनी यापूर्वी चाकणच्या दंगलीमध्ये माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते, असा आरोपही मोहितेंनी केला. आमचे वरिष्ठ नेते सांगतील त्याप्रमाणे ३१ तारखेच्या अविश्वास ठरावाबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com