'ते' धादांत खोटं ; अजित पवार भडकले 

निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल,
'ते' धादांत खोटं ; अजित पवार भडकले 
Sarkarnama (61).jpg

पुणे : ''काही लोकांमुळे सहकार खाते बदनाम होत आहे, त्याचा फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar म्हणाले. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार विद्याधर अनास्कर यांनी आज स्वीकारला. या वेळी आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

"'राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील 12 आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता, पवार यांनी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका चॅनेलने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार माध्यमांवर भडकले. ''राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी माध्यमांमध्ये सुरु आहे.  मात्र, अशी कुठलीही घटना घडली नाही, या धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे,'' असं अजित पवार म्हणाले.
 
शहरात होणारे स्थलांतर  तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरेल 
पुणे :  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्थितीबाबत याआधी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील Johns Hopkins University शॉन ट्रुलोव्ह आणि भारतातील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या ‘इंडसाय-सीम’ या संघटनेने प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र अभ्यास केले आहेत. यापैकी `इंडसाय-सीम’च्या संशोधनात पुणे  Pune शहरातील तिसऱ्या लाटेला ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in