चंद्रकांत पाटील म्हणतात मनसेसोबत युती होऊ शकते, पण... - Chandrakant Patil says there can be an alliance with MNS, but  | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील म्हणतात मनसेसोबत युती होऊ शकते, पण...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते. 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणे, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितेल.

पंकजा मुंडे म्हणाल्या... पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या मृत्यूची चौकशी कार!
 

यावेळी पाटील म्हणाले, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा प्रश्न पाटील यांनी राज्य सरकारला केला. 

पुजा चव्हाण प्रकरण काय? 

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले...
 

पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित मुलीचे भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख