पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले... - In the case of Puja Chavan suicide, Devendra Fadnavis said ... | Politics Marathi News - Sarkarnama

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

फडणवीस म्हणाले, पुजा चव्हाण आत्महत्या संदर्भातील बातमी मी वाचली आहे. सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो फिरत आहेत. त्या प्रकरणात कोणतेही संशयाचे वातावरण राहता कामा नये. 

पुणे : एक तरुणी आत्महत्या करते. त्या प्रकरणातील सत्य काय आहे, हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सत्य शोधून ते जनतेसमोर आणावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

पुणे महापालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस गुरुवारी(ता. ११ फेब्रुवारी) पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली. 

यावेळी फडणवीस म्हणाले, पुजा चव्हाण आत्महत्या संदर्भातील बातमी मी वाचली आहे. सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो फिरत आहेत. त्या प्रकरणात कोणतेही संशयाचे वातावरण राहता कामा नये. 

पुजा चव्हाण प्रकरण काय? 

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.

पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित मुलीचे भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा

यावेळी फडणवीस म्हणाले, महापौरांनी मला विकासकामांचा आढावा घेण्यासाठी निमंत्रित केले होते. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्या आहेत. चोवीस तास पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. मुळा-मुठा नदी पात्रातील सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा-मुठाचा जायका प्रकल्प फेब्रुवारीमध्ये टेंडर काढून जूनमध्ये त्याचे काम सुरु होणार आहे. 

पुणे मेट्रोचा २१ किलोमीटरचा टप्पा यावर्षी सुरू केला जाणार आहे. मेट्रोच्या दुसर्या टप्यातील कामासाठी पुढील वर्षी निधी मिळेल यासाठी प्रयत्न करू, असेही फडणीस यांनी सांगितले. अभय योजनेमुळे महापालिकेकडे मोठा पैसा जमा झालाय, इतर महापालिकेने हि योजना राबवावी. पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी 500 बसेस धावतील, असे फडणीवस यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख