जुन्नरच्या शेतकरी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

संजय काळे, दिलीप डुंबरे, रूपेश कवडे, धनेश संचे, निवृत्ती काळे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sarkarnama (68).jpg
Sarkarnama (68).jpg

जुन्नर (पुणे) : माजी आमदार दिवगंत शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित काल झाले. या वेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजय जगताप, अशोक पवार, प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पोपटराव गावडे, प्रताप म्हस्के, सत्यशील शेरकर, बाळासाहेब दांगट, अँड. संजय काळे उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात संजय काळे, दिलीप डुंबरे, रूपेश कवडे, धनेश संचे, निवृत्ती काळे या पाच जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कार्यक्रमाला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सारखे इतर अनेक अधिकारीही उपस्थित होते.

शिवसेनेच्या आमदारांनी पोलिसाच्या कानाखाली काढला 'आवाज'
यावेळी पवार यांनी शिवाजीराव काळे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, ''कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लोकांना भेटणं टाळायला हवं. असे सल्ले आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेत. पण काळे यांचा संकल्प होता. म्हणून आम्ही आलो. व्यासपीठ आणि समोरची गर्दी अंतर ठेवून आम्ही कार्यक्रम करु असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मी यायचं ठरवलं, असं पवार म्हणाले. 

''जिल्हा बॅंकेत नेतृत्वाची फळी त्यांनी निर्माण केली. यात शिवाजीराव काळे होते. शेतीपुढे अनेक प्रश्न आहेत. शेतीमालाच्या किंमती वाढल्या. शेतकऱ्याच्या जीवनात स्थिरता आणण्याचे काम बॅंक करीत असतात. पुणे जिल्हा बँकेने ही परंपरा आजही जपली आहे. शेतीमालाच्या किमंती वाढल्या आहेत. तोंडणीचा खर्च निघत नाही. अन्य गोष्टीची योग्य किमंत मिळत नाही.  शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली तर शेतकरी हा  देशाची गरज भागवेल अन् जगालाही अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी घेऊ शकेल. आज दुदैवाने केंद्र सरकारने जेवढे लक्ष द्यायला पाहिजे. तेवढं लक्ष दिलं जात नाही. त्याचाच परिणाम आज शेतीमालाच्या किंमती घसरत आहेत,'' असे पवार म्हणाले.  ''माझ्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही,'' असे पवार म्हणाले. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता यावेळी टीका केली. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com