शिवसेनेच्या आमदारांनी पोलिसाच्या कानाखाली काढला 'आवाज'

उपनिरीक्षक विजय सुगदेव पवार व अन्य पोलिसांना आमदार संजय गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले.
शिवसेनेच्या आमदारांनी पोलिसाच्या कानाखाली काढला 'आवाज'
Sarkarnama (66).jpg

बुलढाणा :  मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या कानाखाली शिवसेनच्या आमदाराने 'आवाज' काढला.  याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील बीबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय सुगदेव पवार व अन्य पोलिसांना आमदार संजय गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.  

बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काल ही घटना घडली. पोलिसाची पाटी लिहिलेली कार रस्त्यावर उभी करून काही जण रस्त्यावर नाचत होते, त्यामुळेवाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या ठिकाणाहून औरंगाबाद येथून बुलढाणाकडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी या पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. गायकवाड यांनी एका पोलिस निरीक्षकाच्या कानाखाली वाजवली.  

आमदार गायकवाड आल्याचे पाहिल्यावर ‘पोलिस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये (एमएच २८ ए.एन ३६४१ ) बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. आपल्या वाहनावावर ‘पोलिस’ अशी पाटी लावून धुडगूस घालणारे हे नेमके कोण होते? आणि अशी पाटी लावणे योग्य आहे का? याबाबत पोलिस प्रशासन आता चौकशी करीत आहे.  

हा प्रकार जवळपास  40 मिनिट सुरू होता. दरम्यान या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती.  अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेले मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद केला व पोलिस लिहिलेल्या त्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून त्यांनी पळ काढला. यात बीबी पोलीस स्टेशनचा सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पवार व त्याचे दोन साथीदार असल्याची समजते.  यावर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी घडलेला प्रकार हा पोलिस खात्याला अशोभनीय असून रात्रीच विजय पवार यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून तात्काळ त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.