खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर असून प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम 

सातव यांची प्रकृती 25 तारखेपासून खालावली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
 Rajiv Satav .jpg
Rajiv Satav .jpg

पुणे : कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव  यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना (ता. २२ एप्रिल) ला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रूग्णालयात २३ एप्रिल पासून उपचार सुरु आहेत. 

सातव यांची प्रकृती 25 तारखेपासून खालावली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सातव यांना बुधवार पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. जहागीर रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले की ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. जहांगीर रुग्णालय विशेष काळजी घेत आहे. मला विश्वास आहे की सातव कोरोनावर नक्कीच मात करतील, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.

राजीव सातव यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी कदम व जहांगीर रुग्णालयांच्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. कदम म्हणाले की, सातव यांनी बुधवारी दुपारी मुंबईला उपचारासाठी नेण्यात येणार होते. मात्र, प्रकृती खालवल्यामुळे त्यांच्यावर येथेच पुण्यात उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील." गरज पडल्यास मुंबईतील डॅाक्टरांची टीम बोलवण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कदम म्हणाले.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि रुग्णालय प्रशासनावर ताण पडू नये, यासाठी कोणीही गर्दी करु नये, फोनवरुनच तब्येतीची विचारपूस करावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केल्याचे कदम यांनी म्हटले.

नरहरी झिरवळ का सांगताहेत, मी जिवंत आहे बघा!

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहे थोरात सातव यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी जहांगीर रुग्णालयात येणार आहेत. 

राजीव सातव यांनी स्वतःहा ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती.  ते म्हणाले होते की ''सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचे पालन करावे'', असे त्यांनी सांगितले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com