परमबीरसिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा : ॲट्रॉसिटीसह गुन्हेगारांना मदतीचा ठपका - police inspector files atrocity case against Parambirsingh and 27 police officials | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

परमबीरसिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा : ॲट्रॉसिटीसह गुन्हेगारांना मदतीचा ठपका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

याचा तपास नंतर ठाणे पोलिस करणार

अकोला : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व पोलिस महासंचालक(होमगार्ड) परमबीरसिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ॲट्रॉसिटीसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीरसिंग यांच्यावर विविध प्रकारचे आरोप आरोप झाल्यानंतर हा त्यांच्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा असल्याची माहिती आहे. दरम्यान हा गुन्हा अकोल्यात दाखल झाल्यानंतर सदर प्रकरण हे ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीरसिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती. सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील  सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये मुंबईचे पोलिस उपायुक्त, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. परमबीरसिंग यांच्या जऴलचे पोलिस काॅन्सेबल यांचायी फिर्यादित उल्लेख आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण-डोंबिवलीमधील काही आरोपी बिल्डरांना संरक्षण, बेनामी इस्टेट, परदेशात गुंतवणूक असे अऩेक आऱोप घाडगे यांनी केले होते. 

काय आहेत घाडगे यांचे आरोप?

परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त,ठाणे शहर व अन्य कोणत्याही ठिकाणी नेमणुकीस असतांना त्याचे सोबत पोलिस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा मो.नं.९८६७०५९२९२ आणि पो.ना.प्रशांत पाटील मो.नं.९८२१८६९६२५ असे दोघजण हे गेले २० वर्षांपासुन सोबत होते. त्यांच्यासोबत दिवसरात्र खाजगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. त्या दोघांनाही परमबीरसिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे, याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीरसिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दुसऱ्याचे नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.

-परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे येथे नेमणूक होण्यापुर्वी ते पोलीस आयुक्त,परिमंडळ-३,कल्याण येथे नेमणुकीस असल्यापासुन ते प्रकाश मुथा (रा. कल्याण) यांना चांगल्या प्रकारे ओळखत असुन ते त्याचे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत रिव्हाॅल्वर  लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवून लायसन्स दिले जात होते. तसेच बिल्डरांची कामे त्यांच्यामार्फत होऊन त्यामध्ये करोडो रूपयांची देवाणघेवाण वा सेटलमेंट करून केली जात होती. जो पोलीस अधिकारी त्यांचे बेकायदेशीर ऐकत नसे
त्याच्याविरूद्ध खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियत्रंण कक्ष येथे केली जात होती. (उदा.पो.नि. कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझ्याविरूध्द पाच खोटे गुन्हे नोंदविले होते.)

-परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांच्याकडे बदल्यांतील भष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे देखील काम करत होते.

परमबीरसिंग यांची करोडो रुपयांची संपत्ती जमविल्याचा  आरोप घाडगे यांनी केला आहे. सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे.

-परमबीरसिंग हे दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनचे डिसीपी कडुन प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलिस आयुक्ताकडुन प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट घेत होते.

परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण रेतीबंदर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हददीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपर वजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज करोडो रूपयाची उलाढाल होत होती. त्यामध्ये पराग मणेरे हे भागीदार होते. रेती माफिया शेगप करेल हा होता. अवैध रेती व्यावसायिकावर कायदेशीर कार्यवाही केल्यास त्या पोलिस अधिकाऱ्याविरूध्द खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकविले जात होते त्यामध्ये मलाही
खोटया गुन्हयात अडकाविले आहे.(सदर बाबत मी दि.१७ मार्च,२०१६ रोजी लेखी तकार
दिलेली आहे.) असेही पत्रात म्हटले आहे. तसेच परमबीरसिंग यांनी त्याचा मुलगा रोहन यांचे नावाने सिंगापुर येथे व्यवसाय सुरू केला असुन त्यामध्ये सुमारे रू.२०००/- करोडची गुतवणंक केली असुन त्यामध्ये सुमारे रू.५००/- करोडचे नुकसान या वर्षी झाल्याचे गोपनीयरित्या समजले आहे.

परमबीर सिंग यांनी अॅन्टालिया रोड, मुंबई येथे रूपये ६३ करोडचा बंगला वजा प्लॅट खेरदी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुलगा रोहन याच्या लग्नानिमित्त चंडिगड, बंगलोर येथे  करोडे रूपये खर्च केले आहेत. लग्नाचे रिसेप्शन मुंबई येथे करण्यात आले होते. परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गु खटवाणी कोपरी यांचेकडे सुमारे रू.१००/-करोडची गुंतवणूक केली आहे. तसेच बिल्डर जितु नवलाणी,मुंबई यांचेकडे सुमारे रू.१०००/-करोडची गुंतवणूक वेगवेगळया
व्यवसायात केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख