उद्धव ठाकरेंनी मेरीट पाहिले! राणेंच्या मित्राला राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे पद...

श्री. अनास्कर हेगेल्या तीस वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.
Vidyadhar Anaskar
Vidyadhar Anaskar

पुणे : ज्येष्ठ बँकींग तज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करीत राज्य शासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

श्री. अनास्कर हे उच्चशिक्षित असून गेल्या तीस वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य ते सहकारी बँकेवर जसे प्रशासक आहेत. त्यांच्या काळात राज्य सहकारी बॅंकेने मोठा नफा कमविला.

देवेंद्र फडणीवस हे राज्यचे मुख्यमंत्री असताना त्यांची राज्य सहकारी बॅंकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना त्यांच्या कामाची माहिती असल्याने त्यांनी अनास्कर यांना कायम ठेवले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अतिशय जवळचे मित्र म्हणून अनास्कर हे ओळखले जातात. राणे यांनी त्यांचा आपल्या आत्मचरित्रात आदरपूर्वक उल्लेख केला आहे. शिवसेना सत्तेवर आल्यानंतर अनास्करांना केवळ या कारणामुळे पद सोडावे लागेल की काय, अशी शंका होती. मात्र अनास्करांची राज्य बॅंकेतील कामगिरी पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर काॅंग्रेस नेत्यांनी त्यांना राज्य बॅंकेवर कायम ठेवलेच. त्यानंतर आता पुन्हा सहकार परिषदेच्या उपाध्यक्षपदावर नियुक्ती करून आणखी विश्वास टाकला आहे. 

नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्सूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे ते कार्यवाहक संचालक आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेने प्रत्येक राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांकरिता स्थापन केलेल्या 'टास्कफोर्स' चे महाराष्ट्र, गुजराथ, राजस्थान व जम्मू-काश्मिर या राज्यांचे सदस्य आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेच्या स्थायी सल्लागार समितीचे ते गेल्या १२ वर्षांपासून सदस्य आहेत. पुणे जिल्हा बँक्स् असोसिएशनचेही ते संचालक आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कायदा दुरुस्ती समितीचे ते उपाध्यक्ष होते.

श्री. अनास्कर यांनी वृत्तपत्रांमधून बँकींगविषयी विपुल लेखन केले आहे. बँकींग विषयावर त्यांची आजपर्यंत आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नुकतीच त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आपल्या बँकींग साक्षरता प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गेली ३० वर्ष सामान्य जनतेला बँकींग विषयक मोफत सल्ला देण्याचे कार्य करीत आहेत.राज्याच्या विकासात सहकार चळवळीचे स्थान लक्षता घेऊन राज्य शासनाने सन १९८६ मध्ये सहकार कायद्यातील कलम १५४ अ नुसार सहकार परिषदेची स्थापना करून राज्यातील सहकार चळवळीच्या सक्षमीकरणाचे काम या परिषदेकडे सोपविले आहे.

सहकार परिषद काय काम करते?

१) सहकारी चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे; २) सहकारी चळवळीचा आढावा घेणे व राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे

३) सहकारी संस्थांना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग व उपाय सुचविणे,

(४) राज्य शासन परिषदेकडे निर्देशित करील अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला अहवाल

(५) राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे याची शिफारस करणे

६) विशेषतः समाजातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग यांच्या विकासासाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान परियोजनांचे मुल्यांकन करणे व नवीन परियोजना सुचविणे

७) सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे

८) विभागामार्फत किया खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचे काम हाती घेणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com