शरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव - Pawar should not know that airport in Khed is not technically possible : Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

शरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव

रूपेश बुट्टे पाटील
सोमवार, 12 जुलै 2021

हा जो आरोप माझ्यावर होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही.

आंबेठाण (जि. पुणे) : खेड तालुक्यात तांत्रिकदृष्ट्या विमानतळ शक्य नाही, हे कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवारांना माहीत नसावे. केंद्र आणि राज्याच्या दोन्ही एअरपोर्ट अथोरिटीने तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे माझ्यामुळे नाही तर तांत्रिकदृष्ट्या विमानतळ गेले आहे, तरीही विमानतळ आणायचे असेल तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. (Pawar should not know that airport in Khed is not technically possible : Adhalrao)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना विमानतळासाठी तीन पर्याय आहेत. कदाचित खेड तालुक्याचा पुन्हा विचार होऊ शकतो, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली होती. 

हेही वाचा : अमित शहा सहकार मंत्री बनले अन्‌ भाजप नेत्यांकडून धमक्या देणे सुरू

पुरंदरमधील विमानतळाच्या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल अद्याप आलेला नाही, याचा अर्थ पुरंदर विमानतळाची जागा अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार खेड तालुक्यात विमानतळाच्या जागेचा विचार करावा लागेल, असे पवार यांनी सांगितले होते. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खेड तालुक्यात तांत्रिकृष्ट्या विमानतळ शक्य नाही, हे कदाचित पवारांना माहिती नसावे, असे ते म्हणाले. 

माजी खासदार आढळराव म्हणाले की, खेडमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ माझ्यामुळे तालुक्याबाहेर गेले, हा जो आरोप माझ्यावर होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. एअरपोर्ट अथोरिटीने तसा निर्णय दिला आहे, त्यामुळे खेडमधून विमानतळ बाहेर गेले, असेही त्यांनी नमूद केले. 

विमानतळाचे खेडमध्ये स्वागतच  ः दिलीप मोहिते

नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खेड तालुक्याचा पुन्हा विचार होऊ शकतो, या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, खेडमध्ये विमानतळ होत असेल तर मी विमानतळाचे स्वागतच केले आहे. एसईझेडची जी जागा आहे, जेथे कारखाने होऊ शकत नाहीत, तेथे विमानतळ उभारण्या यावे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विरोधदेखील मावळलेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख