Palkhi procession will leave for Pandharpur by ST says Deputy CM Ajit Pawar
Palkhi procession will leave for Pandharpur by ST says Deputy CM Ajit Pawar

वारीचं ठरलं; यंदाही एसटीनेच जाणार पंढरपूरला...वारकऱ्यांची संख्या वाढवली

राज्यातील दहा पालखी सोहळ्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : कोरोनाचे (Covid-19) संकट यंदाही कायम असल्याने पंढरीच्या आषाढी वारीबाबत (Ashadhi Wari) राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात याची घोषणा केली. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पायी वारीला परवानगी देण्यात आलेली नाही. यंदाही एसटीनेच पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होतील. पण यामध्ये वारकऱ्यांची मर्यादा यंदा वाढवण्यात आली आहे. (Palkhi procession will leave for Pandharpur by ST says Deputy CM Ajit Pawar)

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील दहा पालखी सोहळ्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. देहू व आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान सोहळ्यात 100 लोकांना परवानगी तर उर्वरित आठ मानाच्या पालखी सोहळ्यात पन्नास लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तिथून या पालख्या एसटीने पंढरीकडे प्रस्थान करतील. मागील वर्षी प्रत्येक पालखीसाठी एकच बस देण्यात आली होती. यावर्षी प्रत्येक पालखीसाठी दोन बस उपलब्ध करून दिल्या जातील. 

प्रत्येक बसमध्ये 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. वाखरी पासून पंढरपूरपर्यंत दीड किलोमीटर अंतरावर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पायी पालखी सोहळ्याला परवानगी असेल. कोरोनाच्या सर्व नियमांची काळजी घेऊनच पालखी सोहळ्यांचे नियोजन केले जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचे संकट अजून कायम आहे. पायी पालखी सोहळ्याला परवानगी दिल्यास लोक उत्साहात घराबाहेर पडून गर्दी करतील. वारकरी सर्व नियम पाळतील पण लोकांना थांबवता येणार नाही. त्यामुळं पायी वारीला परवानगी दिली नाही. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. वारीची परंपरा टिकवण्यासाठी हा मध्यम मार्ग काढला आहे, असे पवार यांनी सांगितलं. 

राज्यातील दहा मानाच्या पालख्या :

- संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

- संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

- संत सोपान काका महाराज ( सासवड )

- संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

- संत तुकाराम महाराज ( देहू )

- संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

- संत एकनाथ महाराज ( पैठण )

- रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

- संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

- संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com