दिव्यांगांच्या संसारासाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार...  - pune jilha supriya sule will take initiative happy life disabled | Politics Marathi News - Sarkarnama

दिव्यांगांच्या संसारासाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार... 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

येत्या मंगळवारी (ता. २३) मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात हा मेळावा होणार आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि अपंग हक्क पुनर्वसन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

आरोग्यमंत्री म्हणून कमावलेली पुण्याई तुम्हाला कोरोनातून बरी करेल..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त येत्या मंगळवारी (ता. २३) मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात हा मेळावा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी नऊ वाजता या मेळाव्याचे उद्धघाटन होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे समन्वयक विजय कान्हेकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील जास्तीत जास्त विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा हा मेळावा आहे. याद्वारे ज्यांचे विवाह जुळतील त्यांचे लग्न पूर्णतः मोफत लावून देण्यात येणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त दिव्यांग तरुण तरुणी उपास्थित रहावेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी यशवंतराव प्रतिष्ठाण येथे अशोक सोळंके अथवा पुण्यातील सुप्रिया सुळे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या निसर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#Maratha reservation : उदयनराजेंनी घेतली शंभूराज देसाईंची भेट..
  
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व जिल्हा बँकेचे निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेळ आल्यावर सर्व काही ठरवले जाईल सातारच्या किंवा फलटणच्या राजांविषयी बोलण्याचे टाळले. खासदार उदयनराजेंचे भेटीगाठीचे सत्र सध्या सुरूच असून आज त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले की, शंभूराजे देसाई आमचे जवळचे संबंध असून आम्ही नेहमी एकमेकांना भेटतो. आजच्या भेटीत त्यांनी मराठा आरक्षण आणि जिल्हा बँकेचे निवडणुकी संदर्भात चर्चा केलेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी सातारच्या किंवा फलटणच्या राज्यांच्या विचार न करता वेळ आल्यावर निर्णय असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मी त्यांना विनंती केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नाबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख