पिंपरी-चिंचवडची पुण्यावर एका नंबरने आघाडी 

राहण्यास योग्य शहराच्या २०२० मध्ये झालेल्या या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेचे कामकाज व शहराचे हवामान हे तीन निकष निश्चित करण्यात आले होते.
 Pimpri-Chinchwad leads Pune by one .jpg
Pimpri-Chinchwad leads Pune by one .jpg

पिंपरी : महापालिका कामकाजात (म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स) तथा एमपीआय २०२० पिंपरी-चिंचवडने पुण्यावर एका क्रमाकांची आघाडी घेत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर, राहण्यायोग्य शहरांत (इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स तथा) ईओएलआय २०२० उद्योगनगरी १६ वे आले आहे. पुण्याने रहाण्यायोग्य शहरांत मोठी बाजी मारत देशात दुसरा नंबर पटकावला आहे.

नागरिकांना त्यांच्या महनगरपालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे योग्य राहणीमान निर्माण व्हावे या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने आज ही क्रमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आली. एमपीआय ठरवताना कोणत्याही शहराचा महत्वाचा आधार स्तंभ असणाऱ्या प्रशासकीय कारभार या निकषासाठी पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल ठरले. तर, ईओएलआयमध्येही शहराच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून ते 'टॉप २० त आले आहे. 

राहण्यास योग्य शहराच्या २०२० मध्ये झालेल्या या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेचे कामकाज व शहराचे हवामान हे तीन निकष निश्चित करण्यात आले होते. त्यात देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग होता. नागरिकांना पुरविण्यात येणा-या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते. 'नागरिकांचा सहभाग' हा यावेळी महत्वाचा व नवा पैलू होता.

रहाण्यायोग्य शहरांत बंगळूरू (बेंगलोर) देशात अव्वल, तर पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. नवी मुंबई सहावे, मुंबई दहावे, तर पिंपरी-चिंचवड सोळाव्या क्रमांकावर आहे. महापालिका कामकाजात इंदूर एक, तर सुरत दोन नंबरवर आहे. तिसर्या स्थानी भोपाळ, तर चौथ्या नंबरवर उद्योगनगरी आहे. पुणे पाचव्या, तर मुंबई आठव्या क्रमाकांवर आहे.

देशपातळीवर शहराला मिळालेला चौथा क्रमांक हा नागरिकांचा प्रशासन व प्रशासनातील कामकाजावरील विश्वासाची पावती आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. नागरिकांना शहरात राहण्यायोग्य सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रशासनातील नागरिकांचा सहभाग वाढविणे हे आता पालिकेचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे ते म्हणाले. आता शहराला देशपातळीवर अव्वल स्थान मिळवून देणे व त्यासाठी नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे आमचे ध्येय राहील, असे महापौर माई ढोरे म्हणाल्या. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com