राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचा एकाच हेलिकॉप्टरने प्रवास 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये येतआहेत.
Raj Thackeray and Devendra Fadnavis will go to Nashik by the same helicopter
Raj Thackeray and Devendra Fadnavis will go to Nashik by the same helicopter

नाशिक : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज शुक्रवारी (ता. 5 मार्च) नाशिकमध्ये येणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये येत असल्याने मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे व फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरने येणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपला मनसेची साथ मिळाली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला खुले समर्थन दिल्याने युती अधिक घट्ट झाली आहे. त्याशिवाय मनसे पक्षाच्या अंतर्गत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले, मी येतोय, पण गर्दी करु नका ! 

नाशिक : कोरोनामुळे राजकीय नेत्यांचे दौरे, कार्यक्रमांवर देखील परिणाम झाला आहे. प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. यावेळी भेटायला गेलेल्या पदाधिकाऱ्यांना ते म्हणाले, "मी येतोय. पण गर्दी करु नका' 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मामा नित्तरंजन धैर्यशीलराव पवार यांच्या मुलाचा 5 मार्चला विवाह समारंभ आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मात्र नाशिकला कोरोना वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध बंधने टाकली आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नाशिकचे शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी मुंबईत कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे त्यांना ही माहिती दिली होती. 

राज ठाकरे यांचा दौरा असल्याने आणि तो देखील अनेक दिवसांनी होत असल्याने कार्यकर्ते स्वागतासाठी गर्दी करणारच. कार्यक्रमांचेही आयोजन होऊ शकते. अनेकदा या उत्साहात कार्यकर्ते कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी, बंधनेही पाळत नसतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मी येणार आहे, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवा. कोणीही गर्दी करु नये अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com