इंदापूरातील २० ग्रामपंचायती कुणाच्या? हर्षवर्धन पाटील अन् भरणेंनी एकाचवेळी केला दावा  - Who owns 20 Gram Panchayats in Indapur Harshvardhan Patil Anbharane claimed at the same time | Politics Marathi News - Sarkarnama

इंदापूरातील २० ग्रामपंचायती कुणाच्या? हर्षवर्धन पाटील अन् भरणेंनी एकाचवेळी केला दावा 

राजकुमार थोरात 
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या ६० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या ६० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४० ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला. तर ३८ ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचा दावा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला, असून भरणे व पाटील या दोघांनीही २० ग्रामपंचायातीवर समान दावा केला आहे.

हे ही वाचा...

...म्हणून सीता रावणाच्या देशापेक्षा रामाच्या देशात पेट्रोल महाग!

अजितदादांचा राज्यपालांना इशारा अन् फडणवीसांचे नीतिमत्तेचे धडे...

इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका मंगळवार (ता. ९) व बुधवार (ता. १०) रोजी पार पडल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ४० ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले असून २ ग्रामपंचायती संमिश्र असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे. तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन यांनीही ३८ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व असल्याचा दावा केला असून चार-पाच ग्रामपंचायती संमिश्र असल्याचे सांगितले आहे. भरणे व पाटील या दोघांनीही २० ग्रामपंचायतीवर समान दावे केले आहेत.

राष्ट्रवादीने दावा केलेल्या ग्रामपंचायतीची नावे...

सपकळवाडी, अकोले ,पोंधवडी, लोणीदेवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथुर्णे,  रुई,  बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी,कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, नरसिंहपूर, लासुर्णे, शेटफळगढे, पिंपरी बुद्रूक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, व्याहळी, कुंभारगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी (निमगाव केतकी), सरडेवाडी, कोठळी, जाचकवस्ती, जाधववाडी, भोडणी
 
भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती...

चांडगाव, लोणीदेवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे,भिगवण, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्‍वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारेवाडी, गोतोंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी - १, गलांडवाडी- २, बाभूळगाव, गोंदी, भांडगाव, नरसिंहपूर, टणू, भोडणी, कचरवाडी(बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव केतकी),  
 
राष्ट्रवादी  काँग्रेस व भाजप ने समान दावा केलेल्या २० ग्रामपंचायती...

चांडगाव, लोणीदेवकर, बळपुडी, पळसदेव, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, कुंभारगाव, सराफवाडी, कचरवाडी (निमगाव-केतकी) व्याहळी, हगारेवाडी, गोतोंडी, निमसाखर, सरडेवाडी, भांडगाव, नरसिंहपूर, भोडणी, निंबोडी, जाधववाडी 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख