सुप्रिया सुळे म्हणतात....आपण लढतोय, आपण जिंकूदेखील!

त्या ऋणातून उतराई होण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत असते.
Supriya Sule thanked the voters who were elected for the third time from Baramati
Supriya Sule thanked the voters who were elected for the third time from Baramati

पुणे : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी सलग तिसऱ्यांदा आपण सर्वांनी मला दिली, त्याला आज (ता. २४ मे) दोन वर्षे पूर्ण झाली. आपण माझ्यावर जो विश्वास, प्रेम आणि आपुलकी दाखविली, त्या ऋणातून उतराई होण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत असते, अशा शब्दांत बारामतीतून तिसऱ्यांदा निवडून दिलेल्या मतदारांचे (voters) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आभार मानले. (Supriya Sule thanked the voters who were elected for the third time from Baramati)

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून येण्याच्या घटनेला ता. २४ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट करत मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत.

पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकजण माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे या मतदारसंघाच्या हिताच्या मुद्यांची केंद्रात तड लावण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. आपल्या आशीर्वादामुळेच मी हे काम करु शकतेय. आपल्या शुभेच्छांचं बळ माझ्या पाठीशी आहे, याची मला कायम जाणीव आहे.

हेही वाचा : कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी जिजाऊ गुरुकुलने घेतला मोठा निर्णय
 
आपला बारामती मतदारसंघ सर्व सुविधा व सेवांच्या बाबतीत देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय, हे आपणा सर्वांच्या साथीने पाहिलेलं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीत आहे. आपण दोन वर्षांपूर्वी निवडून दिलेल्या सतराव्या लोकसभेचं कामकाज सुरु झालं व कोरोनाचं थैमान सुरु झालं. यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. आपली सर्वांची संपूर्ण शक्ती केवळ या विषाणूचा सामना करण्यात खर्च होत आहे. तरीही आपण पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही महत्वाची कामे करु शकलो आहोत. याशिवाय आरोग्यसेवा अधिकाधिक मजबूत करण्यासाठीदेखील आपण प्रयत्न करीत आहोत, असेही खासदार सुळे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी अगदी गावपातळीवरील यंत्रणाही पूर्ण क्षमतानिशी काम करीत आहेत. या सर्वांचा आढावा मी सातत्याने घेत असते. कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या प्रत्यक्ष भेटींवर मर्यादा आल्या आहेत. पण, सोशल माध्यमे व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण भेटत आहोत. ही स्थिती लवकरात लवकर आटोक्यात येऊन सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर येईल. सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास आहे. आपण लढतोय, आपण जिंकूदेखील. पुन्हा एकदा धन्यवाद.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com