कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी जिजाऊ गुरुकुलने घेतला मोठा निर्णय

पैशांअभावी अनेकांचा मृत्यू झाला आहे.
Jijau Gurukul in Barshi will provide free residential education to the children of parents who have died due to corona
Jijau Gurukul in Barshi will provide free residential education to the children of parents who have died due to corona

बार्शी (जि. सोलापूर)  ः गेल्या वर्षभरापासून राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या काळात ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता होती, त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले. पण, ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांची मोठी परवड होऊन औषध उपचारांपूर्वीच अनेकांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पालक गेल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात येत असल्याचे ओळखून खांडवी (ता. बार्शी) येथील जिजाऊ गुरुकुल संस्थेने त्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. (Jijau Gurukul in Barshi will provide free residential education to the children of parents who have died due to corona) 

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लॉकडाउनमुळे गेली वर्षभरापासून हाताला काम नाही, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या ग्रामीण भागातील सामान्य पालक केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अथवा सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, त्यामुळे पैशांअभावी अनेकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महाराष्ट्रातील पालकांच्या घरातील मुलांची निवासी शिक्षणाची जबाबदारी बार्शी तालुक्यातील जिजाऊ गुरुकुल खांडवी संस्थेने घेतली आहे. यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 (कॉमर्स/सायन्स) मधील विद्यार्थ्यांना (हॉस्टेल मेस, कॉलेज, शाळा) सर्व शिक्षणासह निवास, जोवणाची मोफत सोय केली जाणार आहे. काही विद्यार्थी पोलिस, लष्कर भरतीचा अभ्यास करत असतील आणि त्यांना आई व वडील नाहीत, अशा विद्यार्थ्यांचासुद्धा ते भरती होइपर्यंतचा संपूर्ण खर्च ही संस्था उचलणार आहे.

जिजाऊ गुरुकुल खांडवी ही संस्था गेली 11 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. संस्थेमध्ये मुलांना निवासी सैनिकी पॅटर्न पद्धतीने पूर्ण शिक्षण दिले जाते. मुलांना निवास, भोजन, शिक्षण तसेच खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध आहेत.

कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्यांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अशा मुलांना शिक्षण देऊन त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संभाजी घाटगे यांनी सांगितले.

आपल्या आजूबाजूला, गावांत कुठेही ज्या पाल्यांना आई वडील नसतील किंवा अत्यंत परिस्थिती बिकट आहे, असे विद्यार्थी असतील तर जिजाऊ गुरुकुल, खांडवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन घाडगे यांनी केले आहे. संपर्क :  8830949306

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com