राष्ट्रवादीचे देशमुख ठरले परिचारक गटाच्या देशमुखांना भारी

कासेगावसह गटातील इतर गावातूनही भालकेंना मताधिक्य मिळवून देत पक्षाची बूज राखली आहे.
NCP's Vijay Singh Deshmukh gave the lead to Bhagirath Bhalke  in Kasegaon
NCP's Vijay Singh Deshmukh gave the lead to Bhagirath Bhalke  in Kasegaon

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) विधानसभेची पोटनिवडणूक विविध अंगाने चर्चेची ठरली तशी ती राज्यभरातदेखील चांगलीच गाजली. अटीतटीच्या या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे (Samadhan Avtade) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके ( Bhagirath Bhalke) यांच्यावर अवघ्या 3 हजार 733 इतक्या मतांनी बाजी मारली. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची पुरती फजिती झाली. (NCP's Vijay Singh Deshmukh gave the lead to Bhagirath Bhalke  in Kasegaon)

निवडणुकीतील जय पराजयानंतर वरिष्ठ नेत्यांचे विचारमंथन सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गट आणि गावनिहाय मिळालेल्या मतांची बेरीज-वजाबाकी सुरु केली आहे. त्यातूनच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत केलेल्या कामाचे मूल्यमापनदेखील सुरु झाले आहे.

पंढरपूरच्या निवडणुकीत कासेगाव जिल्हा परिषद गटाची भूमिका महत्वाची मानले जाते. मागील तिन्ही निवडणुकीत कासेगावकरांनी दिवगंत आमदार भारत भालकेंना मताधिक्य दिले होते. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतही त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंच्या पारड्यात अधिक मतांचे दान टाकले आहे. कासेगावमधून 661 तर जिल्हा परिषद गटातून एकूण 1 हजार 4 61 इतके मताधिक्य भालकेंना मिळाले आहे. त्यामुळे  या पोटनिवडणुकीमध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांच्यापेक्षा विठ्ठलचे संचालक विजयसिंह देशमुख हे भारी ठरल्याची चर्चा सुरु आहे.

कासेगाव जिल्हा परिषद गट हा परिचारकांचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांनी 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये  भगिरथ भालकेंचा पराभव केला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीकडे  कासेगाव गटातून कोणाला किती  मताधिक्य मिळणार याची उत्सुकता होती. निवडणुक प्रचारादरम्यान वसंत देशमुख व प्रशांत देशमुख यांनी भाजप उमेदवार समाधान अवताडे यांना, तर विजयसिंह देशमुखांना भगिरथ भालकेंना मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले होते.

मागील तीनही विधानसभा निवडणुकीत विजयसिंह देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कासेगावसह गटातून दिवगंत आमदार भारत भालकेंना मताधिक्य दिले होते. तर मागील  2019 च्या विधानसभा निवडणुकीतदेखील कासेगावमधून आमदार भारत भालकेंना 1 हजार 800 इतके मताधिक्य मिळाले होते. दीड वर्षानंतर कासेगावसह गटात अनेक राजकीय समीकरणे बदली आहेत. तरीही विठ्ठलचे संचालक विजयसिंह देशमुखांनी अखेरपर्यंत खिंड लढवून कासेगावमधून 661 तर गटातील 9 गावांमधून 1 हजार 4 51 इतके मताधिक्य भगिरथ भालकेंना दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोघा देशमुखांना एक देशमुख भारी पडल्याची जोरदार चर्चा कासेगाव परिसरात सुरु आहे.

पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या  तालुका अध्यक्षपदावरुन अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यावेळी भगिरथ भालकेंनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुखांची पाठराखण केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील पाटील गट भालके यांच्यावर नाराज होता. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोनवेळा मध्यस्थी करुन वाद मिटवला होता. या सगळ्या वादावादीनंतर राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या गावातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार की विरोधी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बाजी मारणार याचीही उत्सुकता होती. यामध्ये विजयसिंह देशमुख यांनी आपली शक्ती पणाला लावून कासेगावसह गटातील इतर
गावातूनही भालकेंना मताधिक्य मिळवून देत पक्षाची बूज राखली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com