तलवारी नाचविणाऱ्यांना पोलिसांनी तक्रार नसल्याचे सांगून मोकाट सोडले 

जमावबंदी लागू असतानाही दौंड पोलिस ठाण्यात रात्री दोन्ही गट फिर्याद देण्याकरिता मोठ्या संख्येने जमा झाले होते.
Minor quarrel between two groups in Daund city
Minor quarrel between two groups in Daund city

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरात भररस्त्यावर किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात जमावाकडून तलवारी, गज व काठ्या घेऊन अर्धा तास धुडगूस घालण्यात आला. परंतु दौंड पोलिसांनी तक्रार नसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत कारवाई टाळली. पोलिसांच्या या भूमिकेवर शहरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

दौंड-गोपाळवाडी रस्त्यावर सरपंच वस्ती येथे 28 मार्च रोजी रात्री हा प्रकार घडला. दौंड शहरातील एका तरुणाचा सरपंच वस्ती येथे चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा व गाळा आहे. गाड्यावर आलेल्या एका ग्राहकास मद्यपान करण्यास नकार दिल्यानंतर वादास सुरूवात होऊन मारामारी झाली.

मारहाणीची माहिती मिळताच गोपाळवाडी गावातील काही तरुण व गाडाचालकाचे दौंड शहरातील मित्र दुचाकी वाहनांवर सरपंच वस्ती येथे जमा झाले. वर्दळीच्या वेळी हातात तलवारी व गज मिरवून दहशत माजविण्यात आल्याने भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी आलेल्या महिला व मुलांना अक्षरशः जीव मुठीत धरून पळावे लागले. धुडगुस घालणारे मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. 

जमावबंदी लागू असतानाही दौंड पोलिस ठाण्यात रात्री दोन्ही गट फिर्याद देण्याकरिता मोठ्या संख्येने जमा झाले होते. पोलिसांनी ज्यांना इजा झाली आहे, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. परंतु मध्यरात्री दोन्ही गटांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आल्याने तक्रार देण्यात आली नाही. मद्यपानासाठी रस्त्यावर धुडगुस घालणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, त्याबद्दल दौंड शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

तंटामुक्त समितीमध्ये वाद मिटला 

दोन्ही गट तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात आले होते. परंतु तंटामुक्त गाव समितीमध्ये त्यांचा वाद मिटला आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नावे निष्पन्न करून कारवाई केली जाणार आहे, असे दौंडचे परीविक्षाधीन उपअधीक्षक मयूर भूजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा : महाआघाडीला कॉंग्रेसच्या, तर सहकार पॅनेलला भाजपच्या नाराजीचा फटका बसणार? 

ठाणे : सहकार क्षेत्रामध्ये सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी उद्या (मंगळवारी, ता. 30 मार्च) मतदान होणार आहे. सहकार पॅनेलविरोधात महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेल अशी थेट निवडणूक होणार आहे. 

या अगोदर सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता 15 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण 18 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून या वेळी सुमारे तीन हजार 62 मतदार हक्क बजावणार आहे. 

कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होणार असल्याने एका केंद्रावर केवळ 300 मतदारांनाच परवानगी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 110 निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 

धुळवडीच्या दुसऱ्याच दिवशी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. बॅंकेवर बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनेलच्या (या पॅनेलमध्ये भाजपचा समावेश आहे) संचालक मंडळाचे वर्चस्व आहे. त्याला टक्कर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाविकास आघाडीप्रणित परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे.

सहकार पॅनेलला शिट्टी; तर परिवर्तन पॅनेलला कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. बविआने भाजपला या निवडणुकीत गुंडाळल्याची चर्चा आहे; तर महाविकास आघाडीने कॉंग्रेसला कमी जागा दिल्याने थोडा नाराजीचा सूर होता. त्यामुळे या मतभेदाचा परिणाम मतदानावर किती होतो, हे पाहणे गरजेचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com