इंदापूर माझी जन्मभूमी, त्यामुळे तेथे गेल्यावर मी तसंच बोलणार  - Guardian Minister Dattatreya Bharane took Overview of the Corona situation in Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

इंदापूर माझी जन्मभूमी, त्यामुळे तेथे गेल्यावर मी तसंच बोलणार 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 9 जुलै 2021

इंदापुरात आणि सोलापुरात सर्व काही सुरळीत चालू आहे. पत्रकारांनी मला फक्त सहकार्य करावे.

सोलापूर : इंदापूर माझी जन्मभूमी आहे. तेथील लोकांनी मला भरभरून दिले आहे. त्यामुळे इंदापुरात गेल्यानंतर मी तसंच बोलणार, अशी स्पष्टोक्ती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज (ता. ९ जुलै) दिली. (Guardian Minister Dattatreya Bharane took Overview of the Corona situation in Solapur)

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा : संजय शिंदे गटाचा दावा फोल ठरवत नारायण पाटील गटाचे सभापतिपदावर शिक्कामोर्तब
 
सोलापुरात खूप चांगले काम चालू आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हितासाठी आपल्याला जे जे काही करता येईल, ते करायचे आहे, असे आपण सोलापुरात सांगता आणि इंदापूरला गेल्यानंतर मला सोलापूरच्या पालकमंत्रिपदापेक्षा इंदापूर तालुका महत्त्वाचा असल्याचे सांगता. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर पालकमंत्री भरणे आज भरभरुन व दिलखुलासपणे बोलले. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

तुम्हीच मागील चार ते पाच महिन्यांपूर्वीचे काही तरी काढता आणि त्याला नवीन जोडून तेच वारंवार दाखवता. तुमच्या डोक्‍यात सतत पालकमंत्री, पालकमंत्री एवढाच विषय असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. इंदापूर आणि सोलापूर हे माझचं आहे. इंदापुरात आणि सोलापुरात सर्व काही सुरळीत चालू आहे. पत्रकारांनी मला फक्त सहकार्य करावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या वेळी व्यक्त केली.
 
 नगरसेवक पाटलांचा राग सरकारवर 

सोलापूरला मुबलक प्रमाणात कोरोना लसीचा पुरवठा होत नाही. या संदर्भात सोलापूर महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर राग व्यक्त केला होता. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पालकमंत्री भरणे व नगरसेवक पाटील एकामेकांच्या समोर आले होते. त्यावेळी सोलापूरला मिळणाऱ्या लसीचा विषय समोर आला आहे. नगरसेवक पाटील यांचा राग पालकमंत्र्यांवर नसून राज्य सरकारवर असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी नगरसेवक पाटील यांच्यासमोर सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख