भरणेंना ह्या अटींवर दिली निवडणूक आयोगाने सोलापूर दौऱ्यास परवानगी 

निवडणूक आयोगाची परवानगी वेळेत न मिळाल्याने पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचा दौरा रद्द करावा लागला होता.
The Election Commission gave conditional permission to Dattatreya Bharane to visit Solapur
The Election Commission gave conditional permission to Dattatreya Bharane to visit Solapur

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे उद्या (शनिवारी, ता. 27 मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या दुपारी 4 वाजता ही आढावा बैठक होणार आहे. 

पालकमंत्री भरणे यांचा हा दौरा व अधिकाऱ्यांसोबतची बैठक शुक्रवारी (ता. 26) रोजी प्रस्तावित होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची सध्या पोटनिवडणूक सध्या सुरू आहे.

या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सोलापूर जिल्ह्यात येऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांना भारत निवडणूक आयोगाची परवानगी आवश्‍यक होती. शुक्रवारच्या दौऱ्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी वेळेत न मिळाल्याने पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचा दौरा रद्द करावा लागला होता. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. 26) रात्री उशिरा या दौऱ्याची परवानगी पालकमंत्री भरणे यांना दिली. भरणे हे उद्या दुपारी चार वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोनासंदर्भातील प्रश्‍न व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. त्या संदर्भातील निर्णय घेतले जाणार आहेत.

पंढरपुरातील पोटनिवडणुकीवर परिणाम होईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये. तसेच, पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना बैठकीला बोलू नये, अशी सूचनाही केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव अनिल कुमार यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबतची सूचना केली आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोनामुक्तीच्या लढाईत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. 
- दत्तात्रेय भरणे, पालकमंत्री सोलापूर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com