भाजपची सुपारी घेऊन अधिकाऱ्यांकडून फोन टॅपिंग : विश्‍वजित कदम 

फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल.
Police officers tapped phones with betel nuts from BJP : Dr. Vishwajeet Kadam
Police officers tapped phones with betel nuts from BJP : Dr. Vishwajeet Kadam

सांगली : "पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी राजकीय सुपारी घेऊन फोन टॅपिंग केले आहेत. यामागे भारतीय जनता पक्षाचे कटकारस्थान आहे. त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल,'' असे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले. 

केंद्रातील कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेसने शुक्रवारी (ता. 26 मार्च) उपोषण करून शेतकरी संघटनांना पाठिंबा दिला. या आंदोलनादरम्यान डॉ. कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. 

डॉ. कदम म्हणाले,"भाजपची नीती आता सर्वांच्या लक्षात आली आहे. देशातील महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला ठेवून दर महिन्याला एखादा वेगळाच मुद्दा त्यांच्याकडून समोर आणला जातो. त्यावरून राजकारण पेटवले जाते. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे.'' 

""केंद्रातील कृषी कायद्याविरोधात तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रश्‍नावर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. अशावेळी वेगळाच मुद्दा घेऊन भाजप राजकारण करत आहे. राजकीय हेतूने फोन टॅपिंग करणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपने हे कटकारस्थान रचले आहे. राज्यात गेले काही दिवस जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. लोकशाहीत संसद व विधानसभा सर्वोच्च आहे. परंतु काही अधिकारी लोकशाही, संविधान धोक्‍यात येईल, असे चुकीचे कृत्य करत आहे. याची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी केली. 

ते पुढे म्हणाले,"दिल्लीत तीन महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करीत आहे. परंतु त्याकडे लक्ष द्यायला भाजपला वेळ नाही. केवळ चर्चेचे नाटक केले जात आहे. शेकडो शेतकरी शहीद झाले आहेत, तरी केंद्र सरकारला कायदा बदलण्यास तयार नाही. हे मोठे दुर्दैव आहे. शेतकरी आंदोलन अंगलट येऊ लागल्याने भाजप काहीतरी वादग्रस्त वेगळे विषय उकरून काढून राजकारण करत आहे. स्टंटबाजी करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून रस्त्यावर उतरला आहे.'' 


हेही वाचा : विश्‍वासर्हता टिकवायची असेल तर अहवाल कोणी फोडला? हे फडणवीसांनी सांगावे 

कोल्हापूर : गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल कोणी फोडला? तो कशा पद्धतीने बाहेर गेला, हे चौकशीअंती कळेलच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सुस्पष्टता आणली पाहिजे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी तो अहवाल बाहेर कोणी दिला, हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले पाहिजे. फडणवीस हे गेली 20 वर्षे राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दलची विश्‍वासर्हता टिकवायची असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की मला या संबंधित व्यक्तीने अहवाल दिला आहे. शेवटी कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तेच याविषयी स्वतःहून सांगतील, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत राज्याचे गृहराज्यमंती सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अहवाल फुटीचे खापर फोडले. 

अहवाल बाहेर येणे गुन्हा आहे, तसेच तो फोडणेही गुन्हा आहे. फडणवीसांनी अहवाल फोडला असेल, तर त्यांनी देखील गुन्हा केला आहे का? या प्रश्‍नावर सतेज पाटील यांनी वरील उत्तर दिले. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. 26 मार्च) पाटील बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com