पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत 'बिग बॉस'फेम अभिजीत बिचकुलेंची उडी 

बिचकुले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूरच्या निवडणुकीत आणखी रंग भरला आहे.
"Bigg Boss" fame Abhijeet Bichkule files nomination papers for Pandharpur by-election
"Bigg Boss" fame Abhijeet Bichkule files nomination papers for Pandharpur by-election

पंढरपूर : राज्यातील प्रमुख नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे "बिग बॉस'फेम साताऱ्याचा अभिनेता अभिजीत बिचकुले यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांनी मंगळवारी (ता. 30 मार्च) पंढरपुरात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचकुले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूरच्या निवडणुकीत आणखी रंग भरला आहे. 

विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या विरोधात बिचुकले यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत बिचकुले यांना केवळ दीडशे मते मिळाली होती. तरीही ते चांगलेच चर्चेत आले होते. 

यापूर्वीही त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. त्यानंतर आता ते थेट विठ्ठलच्या पंढरीतून आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहत आहेत. 

पंढरपूर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे हजारो लोक दर्शनासाठी येतात. परंतु येथे विकास झाला नाही. केवळ एक भकास झालेलं गाव म्हणून पंढरपूरची अवस्था झाली आहे, अशी टीका करत लोकांनी मला निवडून दिलं तर मी पंढरपूरचा विकास करून दाखवेन. शिवाय मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासनही बिचुकले यांनी या वेळी दिले. 

पोलिस खात्याला बदनाम करणाऱ्या सचिन वाझे याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या काळातच प्रशासकीय अधिकारी नेत्यांपेक्षा वरचढ झाले आहेत, अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारवरही अभिनेता अभिजित बिचकुले यांनी टीका केली. 


हेही वाचा : ...म्हणून भारतनानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल केला : भगिरथ भालके 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघात फिरत असताना जनतेने आधार दिला, तसेच भरभरून प्रेम दिले. त्यांनीच मला ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरणार आहात, त्या दिवशी आम्हाला भारतनानांच्या वेशभूषेत तुम्हाला बघावयाचे आहे, अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊनच मी आज नानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे, असे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी सांगितले. 

पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून भगिरथ भालके यांना सोमवारी (ता. 29 मार्च) अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. अर्ज दाखल करताना भगिरथ भालके यांनी मंगळवारी (ता. 30 मार्च) (स्व.) आमदार भारत भालके यांच्या पेहरावाप्रमाणेच पांढरा शर्ट, विजार आणि डोक्‍यावर पांढरी टोपी असा पेहराव परिधान केला होता. भारतनानांच्या समाधीचे दर्शन घेऊन भगिरथ यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. भगिरथ यांच्या पेहरावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर बोलताना त्यांनी या पेहरावामागील रहस्य सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com