आम्ही बाहेर जाणार नाही म्हणत कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले 

पण, कायकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीतनव्हते.
Activists rushed to the police saying we would not go out
Activists rushed to the police saying we would not go out

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा तसेच अर्ज भरण्यासाठी गर्दी करुन नका, असे आवाहन करत पोलिसांनी करवीर प्रांताधिकारी कार्यालयातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर आम्ही उमेदवारासोबत फॉर्म भरायला आलो आहे. त्यामुळे आम्ही बाहेर जाणार कसे? असं म्हणत काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने एकच गोंधळ उडाला. 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी (गोकुळ) संघासाठी मंगळवारी (ता. 30 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात झुंबड उडाली होती. या वेळी सामाजिक सुरक्षा अंतराचा फज्जा उडवून इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांसाकडून वारंवार सूचना दिल्या जात होत्या. तरीही, काही कार्यकर्ते विनाकारण करवीर प्रांतांच्या दालनाबाहेर गर्दी करत होते.

या वेळी, करवीर प्रांत व गोकुळचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनीही दालनाबाहेर येवून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. कोरोना संसर्ग वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही नावडकर यांनी केले. 

नावडकर यांच्या आवाहनानंतर काही काळापुरती गर्दी कमी झाली. त्यानंतर दोन ओळी तयार करून अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु राहिले. मात्र, नवीन येत असलेले इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या सूचनांबाबत माहिती नव्हती. त्यामुळे ते इच्छुक उमेदवारांसोबत कार्यालय परिसरात गर्दी करू लागले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. पण, कायकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांकडूनही त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. बाहेर जा- बाहेर जाणार नाही, असा संवाद सुरु झाला. यातच पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. 

कडक नियोजन हवे 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन करावे का? या मानसिकतेत सरकार आहे. यातच कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक करावे लागणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.1 एप्रिल) अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे योग्य ते नियोजन करणे आवश्‍यक आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com