एकेकाचा हिशेब चुकता करण्याचा आमचा इतिहास : पवार-शहा भेटीवर चंद्रकांत पाटलांचा गर्भित इशारा 

त्यामुळे यापुढच्या काळात आणखी राजकीय हिशेब चुकते केले जाणार का?
BJP candidate from Pandharpur constituency Samadhan Avtade's campaign begins
BJP candidate from Pandharpur constituency Samadhan Avtade's campaign begins

पंढरपूर : "आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकादाच्या भेटीनंतर अन्यायावर पांघरून घालणारे नेते नाहीत, तर एकेकाचा हिशेब चुकता करणं, हा त्यांचा इतिहास आहे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अमित शहा यांच्या कथित भेटीवर भाष्य केले. 

सचिन वाझे प्रकरणावर पडदा टाकावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली. त्यामुळे यापुढच्या काळात आणखी राजकीय हिशेब चुकते केले जाणार का? विषयी आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज चंद्रकांत पाटील यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. त्यानंतर आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (ता. 30 मार्च) पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवरही जोरदार टीका केली. 

राज्यात सरकारविरोधात 20 हजार सभा घेणार

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं 
आहे. ते लोकांसमोर आणण्यासाठी किमान 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये येत्या काळात राज्यभरात किमान 20 हजार सभा घेण्यात येतील, त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. मी दोन दिवसांत 9 सभा घेतल्या आहेत, अशी माहितीही प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

हेही वाचा : ...म्हणून भारतनानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल केला : भगिरथ भालके 

मंगळवेढा (जि. सोलापूर) ः आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघात फिरत असताना जनतेने आधार दिला, तसेच भरभरून प्रेम दिले. त्यांनीच मला ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरणार आहात, त्या दिवशी आम्हाला भारतनानांच्या वेशभूषेत तुम्हाला बघावयाचे आहे, अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊनच मी आज नानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे, असे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी सांगितले. 

पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून भगिरथ भालके यांना सोमवारी (ता. 29 मार्च) अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. अर्ज दाखल करताना भगिरथ भालके यांनी मंगळवारी (ता. 30 मार्च) (स्व.) आमदार भारत भालके यांच्या पेहरावाप्रमाणेच पांढरा शर्ट, विजार आणि डोक्‍यावर पांढरी टोपी असा पेहराव परिधान केला होता. भारतनानांच्या समाधीचे दर्शन घेऊन भगिरथ यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. भगिरथ यांच्या पेहरावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर बोलताना त्यांनी या पेहरावामागील रहस्य सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com