शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत १९ महिन्यांनंतर झाले ॲक्टिव्ह  - Shiv Sena MLA Tanaji Sawant will visit Solapur after 19 months | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत १९ महिन्यांनंतर झाले ॲक्टिव्ह 

  प्रमोद बोडके
मंगळवार, 11 मे 2021

त्यानंतर ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

सोलापूर : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिवसेनेला (Shiv Sena) मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाला सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant)  जबाबदार असल्याची टीका मोठ्या प्रमाणात झाली होती. तब्बल 19 महिन्यांपासून सोलापूरकडे दुर्लक्ष केलेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत हे  उद्या (बुधवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. (Shiv Sena MLA Tanaji Sawant will visit Solapur after 19 months)

शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ तानाजी सावंत यांचा बुधवारी आणि गुरूवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच पक्षीय, शासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.

हेही वाचा : काँग्रेसने अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी 

बुधवारी (ता. १२) पंढरपुरातुन या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर ते करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता मोहोळच्या शासकीय विश्रामगृहावर मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. 

शिवसेना नगरसेवक शहर पदाधिकारी तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट युवा सेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत दुपारी ४ वाजता विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना परिस्थितीचे  नियोजन व अडचणी यावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख