धक्कादायक : मोफत कोरोना बेडसाठी घेतले पावणेदोन लाख रुपये..फार्मासिस्ट ताब्यात..

पिंपरी पालिकेच्याच रुग्णालयात एक लाख ऐंशी हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-19T094458.270.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-19T094458.270.jpg

पिंपरी : कोरोना रुग्णाला आयसीयू बेड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड  Pimpri Chinchwad महापालिकेच्या ऑटोक्लस्टर कोविड सेंटरमधील डॉक्टरने एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पालिकेच्याच रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी चार रुग्णांकडून एक लाख ऐंशी हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा आरोपी अमोल बूधा पवार हा आळेफाटा (ता.जुन्नर,जि.पुणे) प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट आहे. Pimpri Chinchwad Two lakhs taken for free corona beds 

दुखद बाब म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये घेतलेल्या चारपैकी तीन रुग्ण मरण पावले. त्यात दोन सख्खे भाऊ व त्यांच्या आईचा समावेश आहे. हे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आहे. म्हणजे गरजू कोरोना रुग्णांकडून मोफत बेडसाठी लाखो रुपये उकळण्याचे उद्योगनगरीतील लोण हे आता थेट उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

आळेफाटा पोलिसांनी पवारला ताब्यात घेतले आहे. त्याची कोणाशी लिंक आहे, याचा तपास त्यांनी सुरु केला आहे. त्याने अनेक अशा गरजूंकडून लाखो रुपये उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे लागेबांधे पिंपरी पालिकेची कोविड सेंटर वा रुग्णालय़ाशी कोणाशी आहे, का याचाही पोलिस चौकशी करीत आहेत.सचिन प्रभाकर इंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते त्यांचे दोन भाऊ व आईला कोरोना झाल्याने ते सिन्नर येथील डॉ. हिरे आरव्ही सेंटरमध्ये दाखल झाले होते.  तेथे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना ऑक्सिजन बेडची गरज होती. सिन्नरमध्ये ती सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांना पिंपरी पालिकेच्या भोसरी येथील नव्या रुग्णालयात हे बेड देतो असे सांगून पवारने प्रत्येक बेडसाठी ४५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना तेथे दाखल न करता मोफत बेड उपलब्ध असलेल्या पालिकेच्या पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे सचिन यांची आई व दोन्ही भावांचे निधन झाले. ते बरे झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या फसवणुकीबाबत पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, हा प्रकार समजताच पिंपरी पालिका सतर्क झाली. पालिकेच्या सर्व रुग्णालयात कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून त्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अथवा इतर व्यक्तींनी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केल्यास ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल करावी किंवा संबंधित रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले आहे.  

पालिकेच्या वैद्यकीय विभागासह इतर कोणत्याही विभागात मानधन अथवा ठेकेदारी पध्दतीने कर्मचा-यांची नेमणूक करताना त्यांच्याकडे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची’ (पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट) मागणी प्रशासनाने करावी अशी मागणी ते आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करणार आहोत. पालिकेची सर्व रुग्णालये व कोविड केअर सेंटर (ट्रिपल सी) मध्ये नागरीकांना दिसेल अशा दर्शनी भागात याविषयी जनजागृती करणारे फलक लावण्याबाबतही प्रशासनाकडे मागणी करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com