मोदी-शहा यांनी इतकं मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते, पण बोलायचे कोणी?” 

बंगालमध्ये घडणाऱ्या घटना या लोकशाहीची पायमल्ली व संविधानाची दुर्गती आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-19T090818.888.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-19T090818.888.jpg

मुंबई :  पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने तृणमूल कॅाग्रेसच्या चार नेत्यांविरुद्ध कारवाई केली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा कहर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचे निधन या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे. mp Sanjay Raut's criticism of Narendra Modi and Amit Shah

“सीबीआयने अचानक सुरू केलेली कारवाई हे ममता बॅनर्जींविरुद्ध पुकारलेले राजकीय युद्ध असल्याचे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. वास्तविक, प. बंगालात कोरोनाची लाट उसळली आहे. हजारो लोक जगण्या-मरण्याचा संघर्ष करीत आहेत. राज्यात संपूर्ण लॉक डाऊन लावण्यात आले आहे. असे असताना सीबीआय पथकाला हे सर्व प्रकरण थोडे संयमाने घेता आले असते. ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचेही चार दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले, पण सीबीआयला कोलकात्यात गोंधळ निर्माण करायचाच होता हे आता स्पष्ट झाले," असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी या निवडणुका जिंकून लोकशाही मार्गाने सत्तेवर आल्या. त्या लोकशाहीचा असा कचरा करणे बरे नाही. सीबीआय प. बंगालात भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करीत आहे हे मान्य, पण मग त्या कारवाईतून मुकुल रॉय, सुवेंदू अधिकारीसारखे लोक का सुटले ? या लोकांनी भाजपात प्रवेश केल्याने सीबीआयने त्यांना उटणे वगैरे लावून अभ्यंगस्नान घातले काय ? प. बंगालमध्ये घडणाऱ्या घटना या लोकशाहीची पायमल्ली व संविधानाची दुर्गती आहे. ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व संघर्षातून तावूनसुलाखून बाहेर पडलेले आहे. हा संघर्षही देशाला नवी दिशा देईल, असा आशावाद अग्रलेखातून व्यक्त केला आहे. 

"आम्ही सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे प. बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल-गाझा संघर्षाइतकाच तीव्र आहे. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचे हे शेवटचे टोक आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा विजय मोदी-शहा यांनी इतका मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. पण सध्याच्या नव्या घडीत प्रत्येक जय-पराजय हा व्यक्तिगतरीत्या घेतला जातो. त्यामुळे जिंकलेल्या ममतांना नामोहरम करून नमवायचेच असे केंद्राने ठरवले असेल तर ते लोकशाही परंपरांना हरताळ फासत आहेत. पण बोलायचे कोणी? हे असेच चालू राहणार आहे,” असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
 Edited by : Mangesh Mahale 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com