खासदार श्रीरंग बारणेंची वर्ल्ड बुक रेकॉर्ड्सकडून दखल, कोरोना काळातील कार्याचा गौरव

इंग्लडमधील या वर्ल्ड रेकॉर्डस संस्थेने खासदारबारणेंना भारतातील आपल्या प्रतिनिधींमार्फत सोमवारी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह बहाल केले.
खासदार श्रीरंग बारणेंची वर्ल्ड बुक रेकॉर्ड्सकडून दखल, कोरोना काळातील कार्याचा गौरव
Shriran Barne.jpg

पिंपरीः मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या कोरोना काळातील कार्याची घेतली दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. त्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन .सोमवारी (ता. १२)गौरव करण्यात आला. त्यांनी हा सन्मान कोरोनायोद्ध्यांना समर्पित केला आहे. (MP Shrirang Barne's entry from World Book Records, glorification of work during the Corona period)

इंग्लडमधील या वर्ल्ड रेकॉर्डस संस्थेने खासदार बारणेंना भारतातील आपल्या प्रतिनिधींमार्फत सोमवारी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह बहाल केले. कोरोनाविरुद्धच्या सुरक्षिततेसाठी आणि रुग्णांचे हाल कमी करण्याकरिता केलेल्या बांधीलकीच्या कार्यासाठी ते देण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात बारणे यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. दीड वर्षाहून अधिक काळ पहिल्या व  दुसऱ्या लाटेतही मतदारसंघात कोरोना रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार व्हावेत, यासाठी मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेऊन मदत केली. त्याची पोचपावती मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या काळात त्यांनी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी  पुढाकार घेतला. हातावर पोट असलेल्यांना मदत केली. अन्नधान्य वाटप कोरोना हॅास्पिलसाठी साहित्याची मदत, कोरोना रूग्णांचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात मतदारसंघातील नागरिकांना त्यांनी एकटेपणा जाणवू दिला नाही.खासदार  म्हणून त्यांच्या मदतीला धावून गेले. वैद्यकीय उपचाराच्या सुविधा निर्माण केल्या. नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी मदत केली. गोरगरिबांना अन्न धान्याची मदत केली. त्याची दखल घेत सन्मानित केल्याप्रित्यर्थ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे खा.बारणेंनी आभार मानले आहेत.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in