‘एचए’ला कोरोना लस निर्मितीची परवानगी द्या : फडणवीसांची हर्षवर्धन यांच्याशी चर्चा  - Hindustan Antibiotics should be allowed to manufacture corona vaccine : Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

‘एचए’ला कोरोना लस निर्मितीची परवानगी द्या : फडणवीसांची हर्षवर्धन यांच्याशी चर्चा 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

लस तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालणार आहोत.

पिंपरी : हिंदुस्थान अॅँटिबायोटिक्स (एचए, Hindustan Antibiotics) कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccine) निर्मितीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकार या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करत असून, या संदर्भात फडणवीस यांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ( Harshvardhan) यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी दिली. (Hindustan Antibiotics should be allowed to manufacture corona vaccine : Fadnavis discusses with Harshvardhan)

लांडगे यांनी सांगितले की, एचए कंपनीत कोरोना प्रतिबंधक लशीची निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी संपर्क साधून याबाबत चर्चा केली आहे. केंद्रीय आरेाग्य मंत्रालयही याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचेही हर्ष वर्धन यांनी फडणवीसांना सांगितले असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा ः देशमुखसाहेब..., काँग्रेसला आणि देशाला आज आपली उणीव भासतेय...

एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक मदत देण्यास तयार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीमुळे एचए कंपनीलाही आर्थिक मदत होईल. त्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. तसेच, लस तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालणार आहोत. या शहरातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरच कंपनीने दुसऱ्यांना लस द्यावी, अशीही आमची मागणी असणार आहे.

दरम्यान, कंपनी सध्या पावडर स्वरुपातील औषधे बनवित आहे. लस बनविण्यासाठी प्राथमिक परवानगी मिळाल्यावरच आम्ही मशिनरींमध्ये आवश्यक बदल करू शकतो, असे एचएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचेही आमदार महेश लांडगे यांनी कळविले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख