देशमुखसाहेब..., काँग्रेसला आणि देशाला आज आपली उणीव भासतेय...

आपल्या नेतृत्वाची गरज होती!
Memories of Vilasrao Deshmukh awakened by Sachin Sawant
Memories of Vilasrao Deshmukh awakened by Sachin Sawant

मुंबई  ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री (स्व.) विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (ता. २६ मे) जयंती. यानिमित्ताने कायम हसतमुख असणाऱ्या या नेत्याच्या आठवणींना काँग्रेससह (Congress) सर्वपक्षीय नेत्यांनी उजाळा दिला. यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. (Memories of Vilasrao Deshmukh awakened by Sachin Sawant)

ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, आदरणीय (स्व.) विलासराव देशमुख साहेब, आज आपली काँग्रेस पक्षाला आणि देशाला नितांत उणीव भासत आहे. आपल्या नेतृत्वाची गरज होती! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!, अशा शब्दांत त्यांनी देशमुख यांची उणीव आज जाणवत असल्याचे सांगितले आहे.

विलासराव देशमुख राजकारणातील जिंदादिल व्यक्तीमत्त्व ओळखले जात होते. बाभूळगावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीही झाले. पण, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख कायम चढता राहिला. मधल्या काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीस ग्रहण लागले होते. मात्र, त्यातून त्यांनी मुसंडी मारत राज्याचे मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रीय मंत्रीपदाला गवसणी घातली होती. केंद्रीय मंत्री असतानाच त्यांचे निधन झाले आणि महाराष्ट्रातील एका राजकीय पर्वाचा अंत झाला.

देशमुख यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांची ज्येष्ठ शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत देशमुख यांना अभिवादन केले आहे.

विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि चित्रपसृष्टीतील आघाडीचा अभिनेता रितेश देशमुख यानेही वडिलांबरोबरचा लहानपणीचा फोटो ट्विट करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत, तर देशमुख यांची स्नूषा आणि सिनेअभिनेत्री जिनेलिया डिसुझा हिनेही विलासराव देशमुखांसोबतचा लग्नातील फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, तुमची आम्हाला कायम आठवण येते. बापलेकीची ती मिठी चिरंतन राहील, अशा शब्दांत जिनेलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com