Atul Bhatkhalkar, Rohit Pawar .jpg
Atul Bhatkhalkar, Rohit Pawar .jpg

भातखळकर, नाकाने कांदे सोलू नका; अन्यथा वांदे होतील!

रुग्णांचे मनोबल वाढावे, तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुंबई : कोव्हिड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोव्हिड सेंटरमध्ये (Covid Center) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, ''असी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhakalkar) यांनी केली होती. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देत भातखळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. (Rohit Pawar criticized Atul Bhatkhalkar)

या संदर्भात रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''नियमांची गोष्ट कोण करतंय? आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी अतुल भातखळकर जी! उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळे स्वतःचेच जास्त वांधे होतील! असा टोला पवार यांनी लगावला आहे. त्याच बरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांनी लस घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. 

प्रकरण काय? 

आमदार रोहित पवार व कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला आमदार पवार यांनी सोमवारी भेट दिली होती. या वेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे, तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले होते. कोव्हिड सेंटरमधील व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले, तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे विशेष कौतुक पवार यांनी केले होते.

कर्जत-जामखेड हे माझे कुटुंब

कर्जत- जामखेड मतदारसंघ हे माझे कुटुंब असून, त्यातील सर्व कुटुंबातील सदस्य आहेत. कोव्हिड सेंटरमधील बधितांच्या मनोबल वाढीसाठी त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. शक्य ते सगळे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. लोकांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, ही आपली संस्कृती, असल्याचे पवार यांनी म्हटेल होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarkarnama (@sarkarnamanews)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com