भाजप नगरसेवकांनी पुरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे मानधन  
pcmc.jpg

भाजप नगरसेवकांनी पुरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे मानधन  

भाजपच्या 76 नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

पिंपरी : राज्यातील राष्ट्रवादीच्या आमदार ,खासदारांनी आपला महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा कित्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  Pimpri Chinchwad Municipal Corporation सत्ताधारी भाजप BJP नगरसेवकांनी गिरवला आहे. तत्पूर्वी पालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दांपत्य नाना ऊर्फ विठ्ठल काटे आणि शीतल काटे यांनीही आपले एक महिन्याचे मानधन अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरीवस्तीत  पुराचे पाणी शिरुन जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जिवितहानीही झाली आहे.

या नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी महापालिकेतील भाजपच्या सर्व 76 नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. 
 
आमदारांवरील खटला मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
महापूराचा मोठा फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत मदतकार्यासाठी पिंपरी पालिकेतील सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी, सत्तर कर्मचारी आणि तीस स्वयंसेवकाचे पथक मदत साहित्य व उपकरणांसह  काल रवाना झाले असल्याची माहितीही महापौरांनी दिली. तर,आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही बाब विचारात घेऊन आम्हा दांपत्याचे एक महिन्याचे मानधन दिले असल्याचे नाना काटे यांनी सांगितले. पालिकेच्या शंभर जणांचे मदत पथक सांगलीसाठी काल रवाना झाले.   
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in