आमदारांवरील खटले मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - supreme court rejects kerala government plea-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

आमदारांवरील खटले मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 जुलै 2021

खटले मागे न घेता त्यावर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलं आहे.

 

नवी दिल्ली : केरळ सरकारला सुप्रीम कोर्टाने Supreme Court झटका दिला आहे. २०१५ मध्ये झालेल्या केरळ विधानसभा Kerala Assembly निवडणुकीत झालेल्या वादात माकप नेत्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.  हे खटले मागे न घेता त्यावर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलं आहे. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.  

राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम.. 

केरळ विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादात माकप नेत्यांवर खटला दाखल करण्यात आले आहेत. हे खटले मागे घ्यावेत, अशी याचिका केरळ सरकारने दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं  फेटाळली आहे.  न्यायाधीश डी.वाय. चंद्रचुड यांनी हा निकाल दिला आहे.  ता. १५ जुलै रोजी याबाबत सुनावणी झाली होती. त्याचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. 

ठाकरे सरकारची बदनामी करणं एसटी कर्मचाऱ्यांला पडलं महागात

न्यायाधीश चंद्रचुड यांनी केरळ सरकारकडे विचारणा केली आहे की, विधानसभेत जो राडा झाला. त्यामुळे जे नुकसान झाले त्याला आमदार जबाबदार नाही का. असा प्रकरणात माफी देणं चुकीचे ठरेल. सभागृहात आमदार ध्वनीक्षेपक फेकतात, तोडफोड करतात, हा त्यांचा व्यवहार योग्य आहे का. याचा सामान्य जनतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार जनतेचे प्रातिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनी करावा.

आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख