कुठंतरी पाणी मुरतंय; म्हणूनच ACBची भाजप नेत्यावर कारवाई : अजित पवार 

जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असे भाजपचे लोक बोलतात.
Ajit Pawar's explanation in Nitin Landage bribery case in Pimpri
Ajit Pawar's explanation in Nitin Landage bribery case in Pimpri

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावरील कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही. भाजप नेत्यांची ती वक्तव्ये चुकीची आहेत. त्याला काही अर्थ नाही. कुठेतरी पाणी मुरत असेल, भ्रष्टाचार होत असेल, तर त्या लोकांना शिक्षा करणे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कामाचा भाग आहे. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलेले आहे; म्हणूनच एसीबीने कारवाई केलीय. या कारवाईत राजकीय हेतू नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना स्पष्ट केले. (Ajit Pawar's explanation in Nitin Landage bribery case in Pimpri)
 
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी वरील बाब स्पष्ट केली.

पालकमंत्री पवार म्हणाले की पिंपरीतील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्ष लांडेग यांच्यावरील कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही. भाजप नेत्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपच्या एखाद्या नेत्यावर अशी काही कारवाई झाली तर ती आम्ही केली आणि जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असे भाजपचे लोक बोलतात, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलेलं आहे म्हणून एसीबीने ही कारवाई केली आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नाही. प्रत्येकाने पारदर्शकपणे काम करावे, ही जनतेची अपेक्षा असते. कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणे हे एसीबीचे कामच आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर त्या लोकांवर कारवाई करणे हा एसीबीच्या कामाचा भाग आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या स्वीय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) सापळा लावून रंगेहाथ पकडले.  स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगे, त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे व शिपाई राजेंद्र शिंदे या चौघांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. 

स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन झाली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात नदी सुधार प्रकल्पावर सादरीकरण होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सादरीकरण संपवून लांडगे व अन्य पदाधिकारी त्यांच्या कक्षात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी पिंगळे यांना महापालिकेच्या वाहनतळ परिसरात लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यांना तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कक्षात आणून चौकशी सुरू केली. त्याच वेळी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी त्यांच्या दालनातून बाहेर पडले.

पिंगळे यांच्यासह तेथील अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. दरम्यान, अध्यक्ष लांडगे यांना बोलावून त्यांच्याकडेही चौकशी केली. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लांडगे, पिंगळे, खामकर व कांबळे यांना घेऊन अधिकारी पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेतून गेले. लांडगे हे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पूत्र आहेत. त्यांचे भोसरीतील  घर व जनसंपर्क कार्यालयाचीही एसीबीच्या दुसऱ्या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com