कंजारभाट समाजानंतर आता गोंधळी समाजाच्या जात पंचायतीचा प्रताप

जातपंचायतीकडून घटस्पोट घेतला नाही म्हणून टाकले वाळीत
jatpanchayat (7).jpg
jatpanchayat (7).jpg

पिंपरी : घरगुती प्रकरणात जात पंचायतीने लक्ष घालून समाजातून बहिष्कृत केल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आले आहे. एका तरुणाच्या पत्नीला नांदायला पाठवायचे की नाही, याप्रकरणात परस्पर निर्णय़ घेत या तरुणाला कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तो न दिल्याने त्याला जातीतून बहिष्कृत केल्याची घटनमा जुलैमध्ये उघडकीस आली होती. त्यानंतर आता वाळीत टाकण्याचे हे लोण गोंधळी समाजापर्यंत पोचले आहे.

या समाजातील एका तरुणाने जात पंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही, म्हणून त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला जातीतून बाहेर काढत त्यांना वाळीत टाकल्याची खळबळजनक घटना आता घडली आहे. After the Kanjarbhat community now the glory of the caste panchayat of the Gondhali community

दरम्यान, जात पंचायतींना  व त्यांच्या बेछूट,अंधाधूंद अशा बेकायदेशीर कारभाराला त्या समाजातील शिक्षित तरुण विरोध करू लागला आहे. कंजारभाट समाजात लग्न झाल्यानंतर तरुणीची कौमार्य चाचणीची प्रथा आहे. ती राज्य सरकारमध्ये  प्रथम श्रेणी अधिकारी असलेले कृष्णा इंद्रेकर यांनी अरुणा भट यांच्याशी १९९९६ ला विवाह करीत ती प्रथम धुडकावली. त्यामुळे बळ मिळून या समाजातील तरुणांनी Stop the V ritual ही चळवळ २०१८ ला सुरु केली होती.

जात पंचायतीने ती सुरु करणाऱ्यांनाविरुद्ध समाजाला भडकावले. त्यांच्याविरुद्ध मानहानी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला.त्यांना वाळीतही टाकले. अशाच एका प्रकरणात पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व कंजारभाट पंचायतीचा महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशचा प्रमुख कवीचंद भाट याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली होती. तर, इंद्रेकर यांच्याकडून स्फूर्ती घेत पिंपरीतीलच विवेक तमायचीकर या तरुणाने कौमार्य चाचणीला फाट्यावर मारून ऐश्वर्या भट या तरुणीशी मे २०१८ मध्ये लग्न केल्याने तो चर्चेचा विषय झाला होता.

आता गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने वाळीत टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांनी एका एकांकिंका लेखक व दिग्दर्शकाविरुद्धच हा बडगा उगारल्याने  त्यांच्या या बेछूट व बेकायदेशीर कारवाईची पुन्हा चर्चा झाली आहे.या नव्या प्रकरणी शहरातील वाकड पोलिस ठाण्यात गोंधळी समाजातील चार पाटील व दहा पंच अशा १४ जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

त्याबाबत सीताराम कृष्णा सागरे (वय ३३,रा.सुमित्रा आंगण,न्यू दत्तनगर, वाकड) या एकांकिंकांचे लेखन व दिग्दर्शन करणाऱ्या तरुणाने फिर्याद दिली आहे.२६ मार्च २०१८ ते आतापर्यंत ही घटना ते राहत असलेल्या वाकड येथील सोसायटीत आणि त्यांच्या महिंदरगी गावी (ता.अक्कलकोट,जि. सोलापूर)घडली आहे. सगरे यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला होता.आमच्याकडून तो घ्यायला हवा होता, असे जातपंचायतीचे म्हणणे पडले.त्याचा राग जात मनात धरून त्यांनी सागरे कुटुंबाला वाळीत टाकले होते.म्हणून त्याविरोधात त्यांनी पोलिसांत धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com