रेमडेसिव्हिर, ऑक्सिजननंतर आता राज्यात रक्तटंचाई 

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही सुरु झाली. त्याचा आणखी फटका रक्तदानाला बसला.
रेमडेसिव्हिर, ऑक्सिजननंतर आता राज्यात रक्तटंचाई 
Blood donors turn their backs on blood donation camps .jpg

पिंपरी : एरव्ही सुद्धा उन्हाळ्यात रक्तदान कमीच होत असते. त्यात कोरोनामुळे त्याने आतापर्यंतच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड यावेळी केला आहे. हा पहिलाच उन्हाळा असा आहे, की त्याने शहरातच नाही, तर राज्यातही प्रथमच निचांकी रक्तदान झाले आहे. कोरोनामुळे रक्तदान कमी झाल्याचे वा त्यावर विपरित परिणाम झाल्याचे सांगितले, तर विश्वास बसणार नाही ना? पण, ते खरे आहे. पालिका व खासगी रक्तपेढीतूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. राज्यात, रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनची अधिच कमतरता आहे. त्यामुळे रक्तांसाठी सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागणार आहे. 

कोरोनाचा फटका समाजातील सर्व स्तरांना बसला असून त्यातून रक्तदातेही सुटलेले नाहीत. त्यामुळे अभूतपूर्व अशा रक्तटंचाईला शहरासह राज्यालाही सध्या सामोरे जावे लागते आहे. दरम्यान, कोरोनामुळे तातडीच्या वगळता इतर शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. परिणामी यावेळच्या उन्हाळ्यात कधी नव्हे,ती रक्ताला मागणीही पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. ही समाधानाची बाब म्हणता येईल. फक्त कोरोना रुग्णांना लागणाऱ्या रक्तातील प्लाझ्मा या घटकाला,मात्र कधी नव्हे ती प्रचंड मागणी आहे.

मात्र, कोरोनाने रक्तदान शिबिरे रोडावल्याने प्लाझ्म्यासाठी दात्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची पाळी कधी नाही,ती आली आहे. श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्मा देणाऱ्याला दोन हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.तर, महापौर माई ढोरे या सुद्धा वैयक्तिक प्रत्येक प्लाझ्मादात्याला एक हजार देत आहेत.

तरुणाई ही रक्तदानात आघाडीवर असते. मात्र, उन्हाळी सुट्टीत ती आपापल्या गावी जाते. इतर रक्तदाते चाकरमानीही हीच वाट चोखाळतो. त्यामुळे उन्हाळ्यात रक्तदान कमी होते. त्यात यावर्षी उन्हाळा सुरु झाला आणि दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही सुरु झाली. त्याचा आणखी फटका रक्तदानाला बसला. कारण या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस व दुसऱ्या डोसनंतर २८ दिवस म्हणजे जवळजवळ दोन महिने ती घेणाऱ्याला रक्तदान करता येत नाही, असे पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीतील डॉ. शंकर मोसलगी यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

पिंपरी-चिंचवड हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद कुबडे यांनीही त्याला दुजोरा दिला. या कारणाामुळेच रक्तदान घटले असल्याचे या दोघांनीही डॉक्टरांनी सांगितले. ही पोकळी व गरज काही अंशी भरून काढण्यासाठी शहरातील पोलिसांनी प्रथमच पोलिस ठाण्यात दोन रक्तदान शिबिरे घेतली. आता, तर १ मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. हाच १८ ते ४५ वयोगटातील  घटक हा मोठ्या प्रमाणात रक्तदान करीत असतो. त्यामुळे पुढील महिन्यात रक्तदानाला करकचून ब्रेक लागण्याची भीती आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in