मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार  - MNS MLA Raju Patil thanked Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

यानंतर केडीएमसी आयुक्तांनी सुद्धा यांची दखल घेत एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास विनंती केली.

डोंबिवली : महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे आभार मानले आहेत. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरुद्ध अशीच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ट्विट केले आहे. (MNS MLA Raju Patil thanked Aditya Thackeray) 

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

डोंबिवलीच्या गांधीनगर नाल्यामध्ये केमिकलचे पाणी सोडले होते. त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये हिरवे पाणी झाले होते. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केले. यानंतर केडीएमसी आयुक्तांनी सुद्धा यांची दखल घेत एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास विनंती केली. त्यानंतर एमपीसीबीने प्रदूषणकाऱ्या रायबो फार्म या कंपनीवर कारवाई केली. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

कंपनीवर कारवाई केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की ''डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील. कारवाई केल्यानंतरचा व्हिडीओ… आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केला होता. 

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या त्यानंतर संबंधित रायबो फार्म कंपनीवर कारवाई झाली.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख