गणेश नाईकांचा शिवसेना, राष्ट्रवादीला दे धक्का! - Shiv Sena, NCP office bearers from Turbhe, Digha division join BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

गणेश नाईकांचा शिवसेना, राष्ट्रवादीला दे धक्का!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

आमदार नाईक यांनी गुंडांना घाबरू नका, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

वाशी : नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार दणका दिला आहे. दिघा, तुर्भे येथील दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील भाजपाची ताकद वाढली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना भारतीय जनता पक्षाला बळ देणारी ठरणार आहे. (Shiv Sena, NCP office bearers from Turbhe, Digha division join BJP)

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. 

हेही वाचा : कार्यक्रमाला अनुपस्थितीत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचे राज्यमंत्र्यांनी गाठले घर!

दिघा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सुभाष काळे, गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारे शाखाप्रमुख केशव चव्हाण, दिघा येथील शिवसेना युवा विभाग अधिकारी सचिन लोंढे, समाजसेविका श्वेता काळे, योगेश शिंदे, शाखाप्रमुख बसवराज गडीवडार, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मल्लेश पुजारी, तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, माजी नगरसेवक प्रल्हाद शेलटकर, राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, तुर्भे तालुका कार्याध्यक्ष नियाज शेख या सर्वांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

या वेळी आमदार गणेश नाईक यांनी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. नवी मुंबई महापालिकेतील सत्तेचा लोककल्याणासाठी वापर केला, असे सांगून आमदार नाईक यांनी गुंडांना घाबरू नका. आपल्याकडे असलेले नैतिकतेचे शस्त्र सर्वात मोठे आहे, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. नाईक यांनी गुंड नेमके कोणाला म्हटले आहे, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख